तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथे राहणाऱ्या भगवान निवृत्ती सपकाळ यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखभर रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4 ते दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 या वेळेत चोरट्यांनी सपकाळ यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि 21,000 रुपये रोख असा एकूण 1,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी भगवान सपकाळ यांनी दि. 13 ऑगस्ट रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 380, 454 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मुरुम येथील अंगणवाडीमध्ये चोरी, 7,500 रुपये किमतीचा माल चोरीला
मुरुम – तुगाव येथील अंगणवाडी क्रमांक 1 व 2 मध्ये 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला आहे. अंगणवाडीचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरट्यांनी गॅस सिलेंडर, गॅस शेगडी, जर्मनी पातले, स्टील कळशी, गहू, तांदूळ, वटाणा, तेल पाकीट, मसूर डाळ, साखर, हजेरी रजिस्टर असा एकूण 7,500 रुपये किमतीचा माल लंपास केला आहे.
याप्रकरणी अंगणवाडी सेविका भाग्यश्री संभाजी दुधभाते यांनी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम 380, 457 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कळंब येथे मोटरसायकल चोरी, गुन्हा दाखल
कळंब येथील तहसील कार्यालय परिसरातून सिध्देश्वर कडबा यांची अंदाजे 12,000 रुपये किमतीची हिरो होंडा पॅशन प्रो मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही घटना 8 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 11.45 ते 12.15 या वेळेत घडली. कडबा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची लाल रंगाची मोटरसायकल (क्र. एमएच 25 एस 6336) अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.
या घटनेच्या अनुषंगाने कळंब पोलीस ठाण्यात 13 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.