येरमाळा :आरोपी नामे-1) आबासाहेब वखरे व सोबत एक महिला यांनी दि.24.04.2024 रोजी 13.00 वा. सु. स्कॉपियो गाडी क्रं एमएच 23 0115 चे चालक नमुद आरोपींनी रॉगसाईडने गाडी घेवून जात असल्यामुळे यात्रे करीता आलेल्या भाविकांच्या 300 ते 400गाड्याने रस्ता जाम झाल्याने फिर्यादी नामे- प्रल्हाद चंद्रकांत सुर्यवंशी पोलीस निरक्षक भुम हे पोलीस स्टाफ सह येरमाळा ते पारडी कडे जाणारे एन एच 52 रोडवर शेतमाल खरेदीकेद्राजवळ येरमाळा येथे वाहतुक जाम झाल्याने वाहतुक सुरळीत करत असताना नमुद आरोपींनी फिर्यादीस व पोलीस स्टाफ यांचेशी हुज्जत घालून आरेरावीची असभ्य भाषा करुन ढकलून दिले. व तुला बघून घेतो अशी धमकी देवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रल्हाद सुर्यवंशी यांनी दि.24.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 353, 332, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे-1)शशीकांत शंकर गायकवाड, वय 35 वर्षे, रा. अंबेहोळ ता. जि. धाराशिव यांनी दि. 28.03.2024 रोजी 12.00 तें 01.00 वा. सु. जिल्हा परिषद कार्यालय धाराशिव येथे दहित वस्ती येथील सिमेंट कॉक्रीट रस्ता प्रमाणपत्रावर नियमबाह्य सही करण्याचे कारणावरुन फिर्यादी नामे- मारुती प्रभाकर अहिरे, वय 49 वर्षे, रा. तांबरी विभाग धाराशिव ने. अंबेहोळ ग्रामसेवक धाराशिव ता. जि. धाराशिव हे पंचायत समिती कार्यालय येथे त्यांचे शासकिय कामकाज करती असताना नमुद आरोपींनी शिवीगळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व शासकिय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मारुती अहिरे यांनी दि.24.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 353, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.