धाराशिव : शिवसेना ( शिंदे गट ) चे माजी खासदार रवींद्र गायकवाड ( रा. उमरगा ) यांच्यावर धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना, माजी खासदार रवींद्र गायकवाड ( रा. उमरगा ) यांनी आपल्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याची तक्रार ( राष्ट्रवादी शरद पवार गट ) चे प्रदेश सचिव मसूद शेख यांनी धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. या तक्रारीवरून
गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या धारा( ए ) 500, 501, नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उमरगा – लोहारा तालुक्यात दुसऱ्या कोणाचा फतवा चालत नाही, फक्त आपला फतवा चालतो, असे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी म्हटले होते. आपण जे बोललो , त्याची मोडतोड करून क्लिप व्हायरल करण्यात आल्याचा खुलासा रवींद्र गायकवाड यांनी केला आहे . आपण कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या नाहीत, पूर्ण क्लिप ऐकावी, असेही त्यांनी म्हटले आहे.