ढोकी : मयत नामे- विजय बाबासाहेब कसबे, वय 24 वर्षे, व सोबत फिर्यादी नामे- बुबासाहेब काशिनाथ कसबे, वय 30 वर्षे, दोघे रा. रुई ढोकी ता. जि. धाराशिव हे दोघे दि.20.04.2024 रोजी 14.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 एव्ही 9536 वर बसुन तडवळा येथे जात होते. दरम्यान रेल्वे कॉर्नर वरुन वळून धाराशिव रोडने रुईकडे जात असताना हॉटेल शिवशक्ती जवळ एका पांढऱ्या रंगाच्या इंडीका गाडीने चे चालकाने बुबासाहेब कसबे यांचे मोटर सायकलला कट मारल्यामुळे मोटरसायकलचा तोल जावून मोटरसायकल घसरुन पडल्याने मोटरसायकलवर पाठीमागे बसलेले विजय कसबे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बुबासाहेब कसबे यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
उमरगा : आरोपी नामे-1) शिवाजी प्रभाकर मंजुळे, वय 31 वर्षे, रा. कुन्हाळी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.10.05.2024 रोजी 20.40 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल एमएच 25 जे 289 ही पोलीस ठाणे उमरगा समोर सोलापूर हैद्राबाद रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.