उमरगा : वेगवेगळे सिम कार्ड वापरुन रॅपीडो , ओला, उबेर बुकिंगच्या नावाखाली आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील लोकांची फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरुद्ध उमरगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-1)ऋशमंत रामकृष्ण रेड्डी, वय 25 वर्षे, रा. 2-64 नसीदुपुरम करोज राज्य आंध्रप्रदेश 518502 ह.मु. येलो कॅफेच्या पाठीमागे महाकाली अपार्टमेंट बालाजी नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव, 2) संगा मोबाईल क्र 7028581699 यांनी दि.नोव्हेंबर 2023 ते दि. 06.05.2024 रोजी त्याचे मोबाईल द्वारे व ऑनलाईन द्वारे उमरगा येथुन वेगवेगळे सिम कार्ड वापरुन आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील विविध मोबाईल धारकांना फोन करुन समोरील ॲटो रिक्षा, रॅपीडो बुकींग, ओला, उबेर बुकींग इत्यादी बुकींगच्या बहाण्याने, मेडीकल यमरजन्सी, असल्याचे सांगुन क्यु आर कोड पाठवून आणेक लोकांची ऑनलाईन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरेश बापुराव कासुळे सहा. पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण रा.जुना उपळा रोड शिवनारायण चौक धाराशिव यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 420, 34 भा.दं.वि.सं. सह कलम 66 (सी), 66(डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण.
ढोकी : आरोपी नामे-1)मनोज दत्तु मने, 2) अक्षय दत्तु माने, 3) दत्तु दादाराव माने, 4) जालिंदर उत्तम माने, 5) खंडु शंकर माने, 6) रवि हरिचंद्र माने, सर्व रा. पानवाडी, 7) प्रतिक पडवळ रा. रुईभर, 8) विमल मनोज माने, 9) रत्नमाला दत्तु माने दोघे रा. पानवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि. 10.05.2024 रोजी 19.30 वा. सु. पानवाडी येथे फिर्यादी नामे-गणेश रंगनाथ मोरे, वय 34 वर्षे, रा. पानवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने जागेच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणेश मोरे यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506,143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.