परंडा – एका शेतकऱ्यास पाच हजार लाचेची मागणी करून पूर्वी तीन आणि आज रोजी दोन हजार लाच घेताना परंडा पंचायत समितीचे एक विस्तार अधिकारी आणि एक ग्रामविकास अधिकारी यांना एसीबी पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले असून, याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नंबर १. भागवत पांडुरंग जोगदंड, वय 57 वर्षे ,विस्तार अधिकारी, पंचायत समिती परंडा , जि.धाराशिव. पत्ता-रौळस गाव ,पो. खडकी घाट, तालुका, जिल्हा बीड. (वर्ग -३) आरोपी नंबर २ प्रदीप मधुकर जाधव, वय 56 वर्षे,ग्रामविकास अधिकारी , ग्रामपंचायत सिरसाव तालुका परंडा, जिल्हा धाराशिव,रा. महालिंगरायवडी, तालुका उमरगा, जि. धाराशिव.(वर्ग -३) अशी या लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.
यातील तक्रारदार शेतकरी ( वय ५० ) यांचे नावे असलेली वाकडी शिवारातील शेत गट नंबर 332 मधील 35 गुंठे जमिनिपैकी 2 गुंठे जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून ग्रामपंचायत पातळीवर 8 अ मध्ये मारुती सोनमाळी याचे नावे घेतलेली बोगस नोंद करून घेतलेली जागा खुली करून देण्याचे अर्जावर गट विकास अधिकारी यांना अहवाल सादर करण्यासाठी यातील आलोसे क्र.1 याने आलोसे क्र.2 यांचे मार्फतीने यापूर्वी 5000 /- रूपये मागणी करून 3000 /- रूपये स्वीकारले तसेच आज रोजी यातील आलोसे क्र.1 व 2 यांनी पंच साक्षीदारा समक्ष यापूर्वी 3000 /- रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित 2000/- रूपये लाचेची मागणी पंचासमक्ष करून 2000/- रूपये लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून आलोसे क्र.1 यांनी पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारले असता त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. सदरबाबत पोलीस ठाणे परांडा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
हा सापळा पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अंमलदार इफतीकार शेख,विष्णू बेळे,विशाल डोके यांनी रचला होता.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा – कार्यालय 02472 222879 टोल फ्री क्रमांक.1064