धाराशिव – अहिल्यादेवी होळकर जयंती मिरवणुकीमध्ये डॉल्बी डिजेचा आवाज ध्वनी तीव्रतेपेक्षा व कर्णकर्कश ठेवून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे- 1)किरण मधुकर सोलंकर, रा. देवकते गल्ली धाराशिव, 2) अनिल उर्फ लिंबराज आप्पाराव डुकरे, रा. एसटी कॉलनी सांजा चौक धाराशिव, 3)चंद्रकांत बाळु पोंदे, रा. जुना बस डेपो धाराशिव यांनी दि. 31.05.2024 रोजी 16.00 ते 22.00 वा. सु. देवकते गल्ली धाराशिव,सांजा चौक धाराशिव,जुना बस डेपो धाराशिव येथे अहिल्यादेवी होळकर जयंती मिरवणुकी मध्ये लावलेले वाद्य हे पारंपारिक पध्दतीने किंवा पोलीसांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे न लावता डॉल्बी डिजे लावून आदेशाचे उल्लघंन केले. तसेच लोकसेवक पो स्टे प्रभारी अधिकारी यांनी दिलेले सीआरपीसी कलम 149 प्रमाणे नोटीसचे आदेशाचे जाणीवपुर्वक अवज्ञा केली. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि.सं. कलम-188अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र गुन्हे नोंदविले आहेत.
रस्ता अपघात
धाराशिव :फिर्यादी नामे-आदित्य अर्जुन जेधे, वय 21 वर्षे, वय 21 वर्षे, सोबत ऋषीकेश दुगाने, करण जोगदंड तिघे रा. रविवार पेठ पटाईत गल्ली अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड यांनी दि.28.05.2024 रोजी 20.30 वा. सु. मोटरसायल क्र एमएच 44 एसी 4372 वरुन अंबाजोगाई येथुन येरमाळा येथे देवीचे दर्शनाकरीता जात असताना कन्हेरवाडी पाटीच्या पुढे अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे हायगय व निष्काळजीपणे चालवून आदित्य जेधे यांच्या मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात आदित्य जेधे, ऋषीकेश दुगाने, करण जोगदंड हे किरकोळ व गंभीर जखमी झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आदित्य जेधे यांनी दि.01.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह कलम 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.