• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 धाराशिवमधील ‘हप्तेखोर’ संस्कृतीचे समूळ उच्चाटन करा!

admin by admin
September 17, 2025
in सडेतोड
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात देवीच्या नावावर नंगानाच, प्रशासनाच्या आशीर्वादाने फोफावले अवैध धंदे!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी वादग्रस्त तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमचा रद्द करून  कायद्याच्या राज्याचा जो सन्मान राखला आहे, तो निश्चितच स्वागतार्ह आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांच्या पाठपुराव्याला आणि पोलिसांच्या निःपक्ष अहवालाला मिळालेला हा विजय आहे. एका अर्थाने, हा एका राक्षसाचा वध आहे, पण आसुरी वृत्तीचा नायनाट नाही. कारण एक तुळजाई बंद होत असताना, जिल्ह्यात अजूनही पाच अशाच ‘सांस्कृतिक’ केंद्रांचा धिंगाणा सुरू आहे आणि आणखी आठ केंद्रे परवानगीच्या रांगेत आहेत. त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की, प्रशासन केवळ एका केंद्रावर कारवाई करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणार आहे की या ‘सांस्कृतिक’ प्रदूषणाचे समूळ उच्चाटन करणार आहे?

आजही जिल्ह्यातील इतर पाच कला केंद्रांमध्ये लोककलेच्या नावाखाली काय चालते, हे जगजाहीर आहे. तिथे पारंपरिक वाद्यांचा सूर नाही, तर कानठळ्या बसवणाऱ्या डीजेचा धांगडधिंगा आहे. तिथे कलेचा आदर नाही, तर कलावतीवर पैशांची उधळपट्टी करत चाललेला अश्लील चाळे आहेत. मद्याचे पाट वाहत आहेत आणि रात्री एकची वेळमर्यादा सर्रास पायदळी तुडवली जात आहे. मग स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का? की ‘अर्थपूर्ण’ हप्त्यांच्या वजनाखाली त्यांचे डोळे आपोआप मिटले जात आहेत? हे सर्व अवैध प्रकार अधिकृत यंत्रणांना दिसत नसतील, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. या शांततेमागे ‘हप्तेखोरी’ची मोठी साखळी कार्यरत असल्याचा आरोप जर नागरिक करत असतील, तर त्यात चुकीचे काय?

तुळजाई प्रकरणाने एक धडा शिकवला आहे: अशा केंद्रांना दिलेली परवानगी ही केवळ मनोरंजनाचा परवाना नसतो, तर तो सामाजिक स्वास्थ्य आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा परवाना ठरतो. असे असताना, आणखी आठ केंद्रांचे अर्ज प्रशासनाकडे मंजुरीसाठी पडून आहेत, हे धक्कादायक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तुळजाई केंद्राचा अर्ज फेटाळून  जी खंबीर भूमिका घेतली, तीच भूमिका या आठ अर्जांच्या बाबतीतही घेणे अपेक्षित आहे. या आठही अर्जांना केराची टोपली दाखवणे, हाच खरा न्याय ठरेल.

केवळ एका केंद्रावरील कारवाईने ही लढाई संपलेली नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. आता गरज आहे ती उर्वरित पाच केंद्रांवर धाडसत्र राबवून त्यांच्यावरही कायद्याचा बडगा उगारण्याची आणि भविष्यात अशा केंद्रांना थारा न देण्याची. धाराशिवला विकासाची गरज आहे, विनाशाच्या या ‘केंद्रां’ची नाही. जिल्हा प्रशासनाने आता केवळ एका फांदीवर नाही, तर या विषवृक्षाच्या मुळावरच घाव घालण्याची हिंमत दाखवावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.

– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह

Previous Post

‘धाराशिव लाइव्ह’चा दणका: जिल्हा प्रशासनाची अखेर माघार, वादग्रस्त तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमचा रद्द!

Next Post

धाराशिव: तुळजाई कला केंद्राचा परवाना अखेर कायमस्वरूपी रद्द; गंभीर गुन्हेगारी आणि नियमांचे उल्लंघन भोवले

Next Post
धाराशिव जिल्ह्यात देवीच्या नावावर नंगानाच, प्रशासनाच्या आशीर्वादाने फोफावले अवैध धंदे!

धाराशिव: तुळजाई कला केंद्राचा परवाना अखेर कायमस्वरूपी रद्द; गंभीर गुन्हेगारी आणि नियमांचे उल्लंघन भोवले

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर लैंगिक अत्याचार

October 24, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंब : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण

October 24, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला

October 23, 2026

Recent Posts

  • भूम : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर लैंगिक अत्याचार
  • कळंब : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण
  • भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई
  • धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!