धाराशिव विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीमध्ये धाराशिवची जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आली असली, तरीही भाजपमधून आलेल्या अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने साळुंके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
साळुंके यांनी सांगितले की, “धाराशिव जिल्ह्यातील एका नेत्याने आमच्यावर अन्याय केला आहे. शिवसेना फुटीनंतर मी शिंदे गटात सहभागी झालो आणि पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. मात्र, उमेदवारी देताना अन्याय झाला असून मी निवडणूक लढणार आणि माघार घेणार नाही.” शिवसेना शिंदे गटात अन्य इच्छुकांमध्ये सुधीर पाटील, नितीन लांडगे आणि शिवाजी कापसे यांचा समावेश होता.
धाराशिव विधानसभा निवडणुकीत बंडखोरीचा सुर साळुंके यांच्या निर्णयामुळे उठला आहे, त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटासमोर एक आव्हान उभे राहिले आहे.
बाईट ऐका