भूम : फिर्यादी नामे- सुशेन श्रीहरी रांजवन, वय 31 वर्षे, रा. ईराचीवाडी ता. भुम जि. धाराशिव यांचे राहत्या घराचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 21.02.2024 रोजी 13.00 ते 13.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम 1,50,000₹ असा एकुण 2,73,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुशेन रांजवन यांनी दि.23.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : फिर्यादी नामे-रमेश मनोहर गायकवाड, वय 57 वर्षे, रा. भाटशिरपुरा ता. कळंब जि. धाराशिव यांचे मंगरुळ येथील शेत शिवारातील शेत गट नं 76 मधील पत्रयाचे शेड मधून अंदाज 1,00,000₹ किंमतीच्या दोन गायी या दि. 22.02.2024 रोजी 22.30 वा. सु. आरोपी नामे- सचिन भिवा झोंबाडे, वय 35 वर्षे, 2) दादा उमराव पवार दोघे रा. भाटशिरपुरा, ता. कळंब जि. धाराशिव हे पिकअप मध्ये चोरुन घेवून जात असताना रमेश गायकवाड यांना मिळून आले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रमेश गायकवाड यांनी दि.23.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 379, 511 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे-ब्रम्हदेव गोविंद करडे, वय 47 वर्षे, रा. बोर्डा ता. कळंब जि. धाराशिव यांचे शेत मालक सुनिता अशोक रुणवाल यांचे हासेगाव के शिवारातील शेत गट नं 215 मधील गोडाउन समोर ठेवलेले मळी काढण्याचे तीन झारे अंदाजे 15,000₹ किंमतीचे संशयीत आरोपी नामे-1) पंडीत गोविंद करडे रा. बोर्डा, 2) तुकाराम रामा काळे, रा. आंदोरा यांनी दि. 22.02.2024 रोजी रात्री 23.00 वा. सु. दि. 23.02.2024 रोजी 03.00 वा. सु. चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ब्रम्हदेव करडे यांनी दि.23.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 379, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुरनं 93/2024 गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान कळंब पोलीसांनी ठाणेच्या पथकाने फिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन संशयीत आरोपी नामे 1) पंडीत गोविंद करडे रा. बोर्डा, 2) तुकाराम रामा काळे, रा. आंदोरा यांना ताब्यात घेवून त्यांच्या कडे नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन कळंब पोलीसांनी नमुद आरोपीस अटक केली असुन त्यांचे ताब्यातुन गुन्ह्यात चोरीस गेलेला माल जप्त करुन गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.