• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गुरुवर्य के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरु

admin by admin
April 16, 2024
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
kt patil
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या प्रांगणात उभा करण्यात आलेला गुरुवर्य के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा येत्या तीन दिवसांत स्वतःहून काढून घ्यावा अन्यथा प्रशासनाच्या वतीने पुतळा काढण्याबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी अंतिम नोटीस जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षास बजावली होती. ही मुदत सोमवारी संपली असून, गुरुवर्य के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा पोलीस बंदोबस्तात काढण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला भोसले हायस्कूल समोरील मैदान शासनाने विद्यार्थांसाठी क्रीडांगणासाठी दिले असताना, त्यावर शाळेची अनाधिकृत बिल्डिंग उभी करण्यात आली, त्याविरुद्ध तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी भोसले हायस्कूल विरुद्ध निकाल दिला होता, ही जागा शासनाची जागा असल्याचा निर्वाळा दिला होता.त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नागरगोजे यांनी शाळेचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश नगर परिषदेला दिले होते. त्यानंतर सुधीर पाटील यांनी महसूल मंत्र्याकडे धाव घेतली असता, अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम आणि त्यावरील व्याज भरण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला देखील सुधीर पाटील यांनी केराची टोपली दाखवली आहे.त्यानंतर देखील सुधीर पाटील यांनी प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हा शासनाची मान्यता न घेताच उभा केला असून, त्याचे अनावरण काही दिवसापूर्वी करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम धाराशिव लाइव्हने दिले होते.

शहरातील भोसले हायस्कुलच्या प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हा शासनाची मान्यता न घेताच शासनाच्या जागेत उभा करण्यात आलेला आहे. तसेच जागेबाबत महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवण्यात आली आहे.त्यामुळे अनाधिकृत तसेच अतिक्रमित इमारत पाडून पुतळा हटवण्यात यावा, अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी १८ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या अर्जाची सत्य पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कोणाच्या परवानगीने पुतळा केला ? याचा खुलासा येत्या २४ तासात करावा अन्यथा दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली होती. त्यानंतर आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षाने थातुरमातुर खुलासा केला होता.त्यानंतर १५ दिवसांत स्वतःहून काढून घ्यावा अशी नोटीस १० जानेवारी रोजी देण्यात आली होती. पण आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने हा पुतळा काढला नाही. त्यानंतर आता शेवटची अंतिम नोटीस देण्यात आली. त्यात तीन दिवसात पुतळा स्वतःहून काढून घ्यावा अन्यथा प्रशासनाच्या वतीने पुतळा काढण्याबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे. ही मुदत देखील १५ एप्रिल रोजी संपली आहे.

काय आहे तक्रार ?

सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ज्या मिळकत क्रमांक ४१२७ वरती अतिक्रमण करुन अनाधिकृत बाधण्यात आलेल्या इमारत संदर्भात मंत्री (महसूल), महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांनी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम व त्यावरील व्याजाचा भरणा करण्याबाबत दिनांक २६ फेब्रुवारी, २०१४ रोजी आदर्श शिक्षण मंडळास आदेशित केलेले आहे.

तथापि मंत्री (महसूल), महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या उक्त आदेशानुसार आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने अध्याप पावेतो अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम व त्यावरील व्याजाचा भरणा केलेला नाही. कै. के.टी.पाटील यांचा मिळकत क्रमांक ४१२७ या शासकीय जागेवर्ती पुर्णाकृती पुतळा उभा करण्याकरिता आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: पुतळा-३११६/प्र.क्र.३०८/२९ दिनांक ०२ मे, २०१७ व संमक्रमांकीत शासन शुद्धीपत्रक दिनांक ०६ मे, २०१७ मधील तरतुदीनुसार जिल्हा प्रशासनाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक असताना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा प्रशासनाच्या विना अनुमती कै. के.टी.पाटील यांचा मिळकत क्रमांक ४१२७ या शासकीय जागेवर्ती पुर्णाकृती पुतळा उभा केला असल्याने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक ०२ मे, २०१७ व संमक्रमांकीत शासन शुद्धीपत्रक दिनांक ०६ मे, २०१७ मधील तरतुदीचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने हेतुपुरस्सर भंग केला आहे.तेव्हा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ज्या मिळकत क्रमांक ४१२७ वरती अतिक्रमण करुन अनाधिकृत बाधण्यात आलेली इमारत व कै. के.टी. पाटील यांचा उभा केलेला अनाधिकृत पुर्णाकृती पुतळा तात्काळ हटविण्यात यावा.

भोसले हायस्कूलच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुख्याधिकारी चिडीचूप

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला भोसले हायस्कूल समोरील मैदान शासनाने विद्यार्थासाठी क्रीडांगणासाठी दिले असताना, त्यावर शाळेची अनाधिकृत बिल्डिंग उभी करण्यात आली, याप्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्याकडे अहवाल मागितला असता, त्यांनी माहितीच दिली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी वसुधा फड यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला भोसले हायस्कूल समोरील मैदान शासनाने विद्यार्थासाठी क्रीडांगणासाठी दिले असताना, त्यावर शाळेची अनाधिकृत बिल्डिंग उभी करण्यात आली आहे, त्याविरुद्ध तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी भोसले हायस्कूल विरुद्ध निकाल दिला होता, ही जागा शासनाची जागा असल्याचा निर्वाळा दिला होता.त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नागरगोजे यांनी शाळेचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश नगर परिषदेला दिले होते. त्यानंतर सुधीर पाटील यांनी महसूल मंत्र्याकडे धाव घेतली असता, अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कब्जे हक्काची रक्कम आणि त्यावरील व्याज भरण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला देखील सुधीर पाटील यांनी केराची टोपली दाखवली आहे.त्यानंतर देखील सुधीर पाटील यांनी प्रांगणात गुरुवर्य के.टी. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा हा जिल्हा प्रशासनाची मान्यता न घेताच उभा केला असून, त्याचे अनावरण काही दिवसापूर्वी करण्यात आले आहे.

याप्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्याकडे अहवाल मागितला असता, त्यांनी माहितीच दिली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी वसुधा फड यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपण वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत नसल्याने आपणाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करू नये ? अशी विचारणा देखील करण्यात आली आहे.

 

Previous Post

धाराशिवमध्ये घरफोडी करणाऱ्या तरुणास अटक

Next Post

ढोकीत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

ढोकीत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

September 6, 2026
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

September 6, 2026
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
  • तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद
  • अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!