धाराशिव : फिर्यादी नामे-राणी संतोष डोंगरे, वय 50 वर्षे, रा. जुना बसडेपो एकता नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचा पाठीमागील दाराची कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 13.04.2024 रोजी 22.00 ते दि. 14.04.2024 रोजी 03.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन देवघारातील ड्राव्हरमध्ये ठेवलेले 5 ग्रॅम वाजनचे सोन्याचे दागिने व एच एफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 8119 असा एकुण 80,000₹ किंमतीचा मालचोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राणी डोंगरे यांनी दि.14.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच गुन्ह्याच्या तापासा दरम्यान फिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन धाराशिव पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपी नामे- शुभम गोपाळ डोंगरे, वय 28 वर्षे, रा. ब्रम्हगाव ता. जि. धाराशिव यास ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्ह्याच्या संदर्भात चौकशी केली असत त्यांने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्याच्या पुढील तपास सुरु आहे.
भुम : फिर्यादी नामे-श्रीकांत हणुमंत पायघन, वय 41 वर्षे, रा. मांडेगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांचे शेत मालक स्नेहल राजेंद्र मिरगणे यांचे भुम शिवारातील शेत गट नं 174 मधील विहीरचे पाणी आरोपी नामे- सुदाम प्रल्हाद कदम रा. भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी त्यांचे मोटीरच्या सहाय्याने विनापरवाना स्वत:चे फायद्यासाठी दि. 08.04.2024 रोजी 10.30 ते दि. 14.04.2024 रोजी पर्यंत उपसा करुन पाण्याची चोरी केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीकांत पायघन यांनी दि.14.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल
लोहारा : आरोपी नामे-1) अरबाज नसिरसाब शेख, वय 23 वर्षे, रा. रहीमनगर नळदुर्ग ता. तुळजापूर, 2) एजाज हुसेन कुरेशी रा. नळदुर्ग ता. तुळजापूर यांनी दि.14.04.2024 रोजी 12.30 ते 02.00 वा.सु. लोहारा ते पाटोदा रोडवरील मार्डी गावचे जवळ आश्रम शाळेजवळ रोडवर आयशर टेंम्पो क्र एमएच 25 बी बी 3053 वाहनामध्यं अंदाजे 05,70,000₹ किंमतीच्या 19 म्हशी वाहनासह असा एकुण 122, 70, 000₹ किंमतीच्या 19 म्हशी बांधून त्यांना पुरेसी हालचाल करता येणार नाही अशा रितीने छळ करुन त्यांची वाहतुक करताना लोहारा पो ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 (1) (डी)(ई)(एच) सह कलम 119 म.पो.का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.