उमरगा : आरोपी नामे-खंडु कमलाकर वासुदेव व त्याचे सोबत दोन अनोळखी इसम रा. भुसणीवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.13.04.2024 रोजी 18.00 वा. सु. युसुफ मकानदार यांचे दुकानासमोर मुरुळी रस्त्यालगत शेतात फिर्यादी नामे- पंकजकुमार सुरेश राठोड, वय 22 वर्षे, रा. कदेर तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,स्टिलचे पाते असलेल्या कंबरेच्या दांडपट्ट्याने छातीवर मारुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- पंकजकुमार राठोड यांनी दि.14.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 326, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भूम : आरोपी नामे-1) सचिन शिंदे, 2) शंकर बलभिरम काळे, रा. पारधी पिडी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.05.04.2024 रोजी 10.30 वा. सु. हॉटेल आदित्य समोर भुम येथे दि. 06.04.2024 रोजी 00.30 वा. सु. बसस्टॅड भुम समोर फिर्यादी नामे- स्वप्निल सुधीर हावळे, वय 29 वर्षे, रा. लक्ष्मीनगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांची मोटरसायकल नमुद आरोपींनी आडवून तु आमचे भांडणात का पडलास या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने मारहाण करुन गंभीर जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- स्वप्निल हावळे यांनी दि.14.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 326, 323, 341, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : आरोपी नामे-1)आयुब नसीर पठाण, 2) शोएब आयुब पठाण, 3) नसरीन आयुब पठाण, 4) शाहीद आयुब पठाण, सर्व रा. गणेश नगर डिकयळ कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 14.04.2024 रोजी 14.30 वा. सु. गणेश नगर डिकसळ कळंब येथे फिर्यादी नामे- परवीन सलीम शेख, वय 40 वर्षे, रा. गणेश नगर डिकसळ कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी बांधकामाचे कारणावरुन शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- परवीन शेख यांनी दि.14.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघात
ढोकी : मयत नामे- फुलेश मनहेर राम उईके, वय 19 वर्षे, रा.सुरेला ता. अंतगढ जि. कांकेर राज्य छत्तीसगड हे दि.13.04.2024 रोजी 02.00 वा. सु. हनुमंत त्रिंबक शिंदे रा. वाखारवाडी ता. जि. धाराशिव यांचे शेतात श्री सेलवीनयका बोरवेलची गाडी क्र टीएन 34 व्ही 4577 हीने बोर घेण्याचे काम करत असताना आरोपी नामे- सुंदरमुर्ती एस शिवलम रा. अरुंतथिअर सिस्ट्री व्यापमपट्टी पुदुर पोस्ट विनोर ता. जि. नामाकल तामीळनाडू यांनी त्याचे ताब्यातील बोरवेलची मशिन ऑपरेट करुन यातील फुलेश उईके याची मान ऑटोमॅटीक चेंजर डुम खाली आडकुन जखमी होवून त्याचे मरणास कारणीभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मनहेर सोमाराम उईके, वय 45 वर्षे, रा. सुरेली ता अंतगढ जि. कांकेर राज्य छत्तीसगड यांनी दि.14.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.