धाराशिव : आरोपी नामे-1) बाबा पाशा मुजावर, वय 55 वर्षे, रा. फरास गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.18.06.2024 रोजी 00.30 वा.सु. फरास गल्ली खिरणी मळा येथे तिन बैल व एक गाय असे एकुण 53,000₹ किंमतीची गोवंशीय जनावरे खिरणीमळा येथील कत्तलखान्यामध्ये अवैधरित्या कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 11(1)(बी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
तुळजापूर :आरोपी नामे-1)मोहन बबन कोळी, वय 36 वर्षे, रा. हगलुर ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर दि.18.06.2024 रोजी 13.30 वा. सु. आपल्या ताब्यातील क्रुझर क्र एमएच 13 एन 7307 ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तुळजापूर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना तुळजापूर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
लोहारा :आरोपी नामे-1)विकास संदीपान गोरे, वय 39 वर्षे, बालाजी सहदेव चौरे, वय 30 वर्षे, दोघे रा. करजखेडा ता. जि. धाराशिव, विठ्ठल किसन कांबळे, वय 38 वर्षे, रा. खेड ता. लोहारा जि. धाराशिव हे तिघे दि.18.06.2024 रोजी 19.20 ते 19.40 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे महिंद्रा मॅक्झिमो क्र एमएच 14 डीटी 9248, महिंद्रा मॅक्झिमो क्र एमएच 12 एच एन 8419 व ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एएम0883 ही वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मार्डी जाणारे रोडवर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लोहारा ते जेवळी जाणारे रोडवर लोहारा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.