धाराशिव – महाराष्ट्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदाची रिक्त पदे भरण्यासाठी यापुर्वीच जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने धाराशिव जिल्हा पोलीस आस्थापनेवरील मंजुर पदे भरण्याची प्रक्रिया दि. 19.06.2024 ते दि.29.06.2024 पावेतो पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असुन यात चालक पोलीस शिपाई पदाच्या 44 जागा असुन त्याकरिता 4,503 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. तसेच पोलीस शिपाई पदाच्या 99 जागा असुन त्याकरिता 3,497 उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले आहेत.
सदर पोलीस भरती करीता जिल्ह्यातुन किंवा जिल्ह्याबाहेरुन मोठ्या प्रमाणावर उमेदवार आदल्यादिवशी अथवा रात्रीच्या वेळी धाराशिव येथे येत असुन त्यांची राहण्यासाठी व्यवस्था नसल्याने तसेच पावसाळा असल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यामुळे पोलीस भरती करीता आलेल्या उमेदवारांपैकी ज्यांची राहण्याची व्यवस्था नसेल त्यांची राहण्याची व्यवस्था स्वागत मंगल कार्यालय, पॉलिटेक्निक कॉलेज समोर धाराशिव व ओम मंगल कार्यालय शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालया जवळ धाराशिव येथे करण्यात आली आहे. तरी पोलीस भरती प्रक्रियातील मैदानी चाचणी करीता धाराशिव येथे आलेल्या उमेदवारांनी त्यांची रात्रीच्या वेळी राहण्याची सोय करण्याची आवश्यकता असल्यास पोलीस नियत्रंण कक्ष धाराशिव मोबाईल नंबर-7588527620 अथवा-गणेश शिंदे, पोलीस कल्याण विभाग, धाराशिव मोबाईल नंबर-9922217189 यावर संपर्क करावा. पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.