वाशी : ऊस तोडणीचे राहीलेले पैसे देण्याच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन धमकी दिल्याने वाशी तालुक्यातील पार्डी येथील एका तरुणाने राहात्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
मयत नामे-भिमा मच्छिंद्र काळे, वय 18 वर्षे, रा. पार्डी ता. वाशी ह.मु. सरमकुंडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.19.06.2024 रोजी 09.00 वा. सु. आरोपी नामे-रविंद्र उर्फ बबलू आबा काळे, रा. सरमकुंडी ता. वाशी, रामा आप्पा शिंदे, दादी नाना पवार, रा. सरमकुंडी, सोनाबाई रविंद्र उर्फ बबलू काळे, रा. सरमकुंडी, लताबाई रामा शिंदे, रा. वाकवड ता. भुम जि. धाराशिव यांचे राहात्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
नमुद आरोपींनी ऊस तोडणीचे राहीलेले पैसे देण्याच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन धमकी दिल्याने त्यांचे त्रासास कंटाळून भिमा काळे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताची आई सिताबाई मच्छिंद्र काळे, वय 50 वर्षे, रा. पार्डी ता. वाशी ह.मु. सरमकुंडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 19.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.दं.वि.संकलम 306, 323,504, 506, 143, 147, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.






