• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, December 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

रणजित पाटील यांचे तिकीट कन्फर्म, राहुल मोटे यांचा पत्ता कट

admin by admin
October 24, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
रणजित पाटील यांचे तिकीट कन्फर्म, राहुल मोटे यांचा पत्ता कट
0
SHARES
2.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा – परंडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत उमेदवारीवरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर हा गोंधळ मिटला असून, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे रणजित पाटील यांचे तिकीट कन्फर्म झाले असून, राष्ट्रवादी ( शरद पवार ) चे राहुल मोटे यांचा पत्ता कट झाला आहे.

परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी ( शरद पवार ) च्या उमेदवारांवरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. . बुधवारी रात्री शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव आणि परंडा या दोन मतदारसंघांसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा केली होती. धाराशिवमधून विद्यमान आमदार कैलास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली, तर परंड्यात स्वर्गीय आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील यांचे नाव उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते.

तथापि, शिवसेना पक्षाच्या अधिकृत लेटरपॅडवर रणजित पाटील यांच्याऐवजी राहुल ज्ञानेश्वर पाटील यांचे नाव छापून आल्याने गोंधळ निर्माण झाला. रणजित यांचे नाव चुकून वगळले गेले की राहुल मोटे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे, याबाबत संभ्रम पसरला होता. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रात आज प्रसिद्ध झालेल्या यादीत परंडा मतदारसंघातून रणजित पाटील यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे हा गोंधळ अधिकच वाढला होता.

अखेर आज हा गोंधळ मिटला असून, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे रणजित पाटील यांचे तिकीट कन्फर्म झाले असून, राष्ट्रवादी ( शरद पवार ) चे राहुल मोटे यांचा पत्ता कट झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी रणजित पाटील यांना एबी फॉर्म सुपूर्द केला आहे.

आता राहुल मोटे कोणती भूमिका घेणार ?

काँग्रेस – शिवसेना ( उद्धव ठाकरे ) – राष्ट्रवादी ( शरद पवार ) या तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे. परंडा मतदारसंघात राष्ट्रवादी ( शरद पवार ) पक्षाकडून माजी आमदार राहुल मोटे इच्छुक होते. सलग तीन वेळा विजयी झालेले राहुल मोटे सन २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्याकडून पराभूत झाले होते. स्व. ज्ञानेश्वर पाटील यांच्या अकाली निधनानंतर त्यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण उद्धव ठाकरे यांनी परंड्याची जागा स्वतःकडे खेचली आहे.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राहुल मोटे हे आपले काका अजित पवार यांच्यासोबत न जाता, शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले होते ,तसेच मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाचे खा. ओमराजे निंबाळकर यांचा जोरदार प्रचार केला होता. पण विधानसभा निवडणुकीत डावलण्यात आल्याने मोटे आता कोणती भूमिका घेणार ? याकडे लक्ष वेधले आहे.

Previous Post

बारामतीत घड्याळ विरुद्ध तुतारी – काका-पुतण्यांचा कुस्ती महोत्सव!

Next Post

धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती गंभीर

Next Post
धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती गंभीर

धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती गंभीर

ताज्या बातम्या

‘धाराशिव लाइव्ह’चा दणका! अखेर ‘धाराशिव 2.0’ च्या ॲडमिनवर गुन्हा दाखल

धाराशिव नगरपरिषद निवडणूक: आचारसंहितेचा भंग करून ‘फेक एक्झिट पोल’ प्रसिद्ध; ‘धाराशिव २.०’ वर गुन्हा दाखल

December 12, 2025
‘धाराशिव लाइव्ह’चा दणका! अखेर ‘धाराशिव 2.0’ च्या ॲडमिनवर गुन्हा दाखल

‘धाराशिव लाइव्ह’चा दणका! अखेर ‘धाराशिव 2.0’ च्या ॲडमिनवर गुन्हा दाखल

December 12, 2025
 निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख आणि ‘धाराशिव 2.0’ विरोधात तक्रार

धाराशिव पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस

December 12, 2025
कळंब नगरपरिषद निवडणूक: शहरात विक्रमी ७२.६९ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद!

‘मी कशाला फंदात पडू?’ म्हणणाऱ्यांची ‘निवृत्ती’ आताच का करत नाही?

December 12, 2025
कळंब नगरपरिषद निवडणूक: शहरात विक्रमी ७२.६९ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद!

 बोगस एक्झिट पोल प्रकरण : “माझी निवृत्ती जवळ आलीय, मी कशाला फंदात पडू?”

December 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group