बारामतीच्या मतदारसंघात यंदा विधानसभा निवडणुकीत अजून एक कौटुंबिक महाभारत रंगणार आहे. विधानसभा निवडणुका येताच बारामतीत काका-पुतण्यात जंगी सामना रंगणार, ते ही विनोदाचा तडका लावून! तारीख आहे २० नोव्हेंबर, आणि हायव्होल्टेज ड्रामा बघायला सज्ज व्हा.
तर झालं असं की, काका शरद पवार विरुद्ध बंड पुकारल्यावर अजित पवारांनी राष्ट्रवादी मूळ पक्ष आणि घड्याळ चिन्ह पळवलं. घड्याळचं काम आहे वेळ दाखवणं, पण अजित पवारांनी ते वेळेत घेतलं ! मग शरद पवारांनी काय केलं, तर त्यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) नावाने नवीन ब्रँड लॉंच केलं. तुतारी वाजवली आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं. लोकसभेत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव केला, तुतारी वाजली, आणि घड्याळाची टिकटिक थांबली.
आता पुन्हा तोच घोळ. अजित पवारांना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी युगेंद्र पवार या ताज्या उमेदवाराला मैदानात उतरवलं आहे. युगेंद्र पवारांचे चिन्ह आहे तुतारी, आणि अजित पवारांचे आहे आपलं घड्याळ. घड्याळाचं काम आहे वेळ दाखवणं, पण कधी वेळ चुकली तर तुतारी वाजेलच!
तर आता बारामतीत काका आणि पुतण्यातली ही धमाल जंगी लढत पाहायला मिळणार आहे. अजित पवारांच्या घड्याळाची टिकटिक सुरू राहते का, की युगेंद्र पवारांची तुतारी पुन्हा एकदा वाजवते? जनता कशासाठी मतदान करणार? वेळ सांगणारं घड्याळ की तुतारीचा आवाज? उत्तर मिळेल २३ नोव्हेंबरला!