धाराशिव जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीवर पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. लोहारा आणि तुळजापूर येथे झालेल्या स्वतंत्र घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे.
लोहारा: दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता लोहारा पोलीसांनी जेवळी उत्तर ते आष्टा मोट रोडवरील येणेगुर टी पॉईंटवर कारवाई केली. यावेळी जुगल दधुळप्पा तुगावे (वय २८, रा. बेळंब, ता. उमरगा) याला त्याच्या मोटरसायकलवर (क्र. एमएच १३ डीबी २६१५) केसरयुक्त विमल पान मसाला आणि तंबाखूचे २० पोते (प्रत्येकी ५० पुडे) असा एकूण २ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम १२३, २७४, २७५, २२३ आणि अन्न सुरक्षा मानके कायदा कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर:त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता तुळजापूर पोलिसांनी मातंगनगर ते पावणारा गणपती रोडवर कारवाई करत प्रशांत धमेंद्र सोनवणे (वय २१, रा. पापनाश नगर, तुळजापूर) याला प्रतिबंधित गुटख्यासह अटक केली. त्याच्याकडून आरएमडी, विमल आणि बादशहा गुटख्यासह एकूण ४१,३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम १२३, २७४, २७५, २२३ आणि अन्न सुरक्षा मानके कायदा कलम ५९, २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(ई), ३०(२)(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.