राज्यात विधानसभा निवडणुकीची धूम सुरू असताना, पत्रकारांच्या तोंडाला चांगलाच बूम लागलेला दिसतोय! भूम-परंडा मतदारसंघात आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुहूर्त पाहून मोठ्या थाटात उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांची गर्दी बघून सावंत साहेबांनी आपली खास बाइट दिली. समोरच्या दहा-पंधरा बूम्सनी काही वेगळाच उत्सव साजरा केल्यासारखं वाटलं.
पत्रकारांसाठी नेहमीचा कार्यक्रम! “आवाज टेस्टिंग, टेस्टिंग… बूम लागला का !” अशी घोषणा करताच सावंत साहेबांनी एक विनोदी शेरेबाजी केली, “माझा बूम कुठे ठेवू ?” तेव्हा एका चॅनलच्या पत्रकाराने लगोलग उत्तर दिलं, “साहेब, हे सर्व बूम तुमचेच आहेत!”
सावंत साहेबांचा हा ‘बूम’ फक्त आवाजाचा नव्हे, तर लक्ष्मीचाही वाटतंय ! धाराशिवमध्ये दोन आणि राज्यात सहा साखर कारखाने, बार्शी-पुण्यात इंजिनियरिंग कॉलेजेस चालवणाऱ्या सावंत यांच्याकडे पैशांची कमी नाही. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक बाइटने टीव्ही आणि यूट्यूब पत्रकारांना लक्ष्मी दर्शनाचा अनुभव दिला जातोय, असं म्हणायला हरकत नाही.
तर, निवडणूक लागली की पत्रकारांच्या बातम्याही लागतात, आणि बूमचं काय सांगता, तो तर सावंत साहेबांचाच दिसतो!
हा घ्या पुरावा, पाहा व्हिडीओ …