येरमाळा : आरोपी नामे-शहाजी शिवाजी शिंदे, बबन शहाजी शिंदे, लाला शहाजी शिंदे सर्व रा. लिंगी पिंपळगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.03.06.2024 रोजी 18.00 वा. सु.बावी शिवारातील शेत गट नं 471 मध्ये फिर्यादी नामे- रोहीदास देविदास शिंदे, वय 32 वर्षे, रा. बावी ता. वाशी जि. धाराशिव यांना शेत कुळवण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीचा दांडा व दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा भाउ धनाजी शिंदे व पत्नी कविता शिंदे या भांडण सोडवण्यास आल्या असता नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन शेती पेरण्यास आले तर तुमचे हातपाय तोडून जिवे ठार मारुन टाकू अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या रोहीदास शिंदे यांनी दि. 04.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : आरोपी नामे- दिनेश नारायण काकडे, स्वाती दिनेश काकडे, प्रदिप दिनेश काकडे,संदीप दिनेश काकडे, सर्व रा. पाथर्डी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 04.06.2024 रोजी 08.00 वा. सु. पाथर्डी येथे फिर्यादी नामे-आयोध्या नारायण काकडे, वय 70 वर्षे, रा. पाथर्डी ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मोटर चालु केलेती का ते मला का विचारले नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा भारत काकडे हा भांडण सोडवण्यास आला असता नमुद आरोपींनी त्यासही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आयोध्या काकडे यांनी दि. 04.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : आरोपी नामे-अमर मिट्टू पायाळ, प्रशांत महादेव गवळी, अनिता मिट्टु पांचाळ, मिट्टु अर्जुन पांचाळ सर्व रा. सापनाई ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 04.06.2024 रोजी 09.00 वा. सु. सापनाई येथे फिर्यादी नामे- सतिश रमेश पांचाळ, वय 27 वर्षे, रा. सापनाई ता. कळंब जि. धाराशिव यांना व त्यांची आई व चुलत भाउ यांनी नमुद आरोपींना शिवीगाळ करुन मारहाण का केली असे विचारण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सतिश पांचाळ यांनी दि. 04.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.