• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, April 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी

admin by admin
December 6, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी
0
SHARES
612
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव शहरातील दत्त कॉलनी येथील रहिवासी असलेल्या सविता राजेश म्हैत्रे (वय ४९) यांच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

सविता म्हैत्रे या त्यांचे पतींसह मोटरसायकलवरून समता कॉलनी येथील दत्त मंदिर समोरील रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची मिनी गंठण (किंमत अंदाजे १ लाख रुपये) जबरदस्तीने हिसकावून पळून गेला.

याप्रकरणी सविता म्हैत्रे यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३९० (४) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.धाराशिव शहरात दिवसाढवळ्या चोऱ्या, लूटमार होत असल्याने शहरात घबराट पसरली आहे, पोलिसांचा वचक संपल्याने गुन्हेगार निर्ढावले आहेत.

धाराशिवमध्ये लग्नाच्या कार्यक्रमातून दोन मोबाईल चोरी

धाराशिव: शहरातील सांजा रोडवरील २२० के.व्ही. सबस्टेशनजवळ राहणारे कृष्ण श्रीपाद कुलकर्णी (वय ४३) यांच्या पत्नीच्या पर्समधून दोन मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही घटना ३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास समता कॉलनी येथे घडली.

कुलकर्णी हे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी समता कॉलनीतील आर.डी. कुलकर्णी यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीने ज्युपिटर स्कूटीला आडकावून ठेवलेल्या दोन पर्समधील दोन मोबाईल फोन (किंमत अंदाजे २२,००० रुपये) अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

याप्रकरणी कृष्ण कुलकर्णी यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७९ (२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Previous Post

धाराशिव सायबर पोलिसांची कामगिरी: ऑनलाईन फसवणुकीत गेलेले ३.७१ लाख रुपये परत मिळवले

Next Post

‘जमिनीवर या, वास्तव पहा अन् मगच बोला’

Next Post
‘जमिनीवर या, वास्तव पहा अन् मगच बोला’

'जमिनीवर या, वास्तव पहा अन् मगच बोला'

ताज्या बातम्या

‘११२’ च्या कॉलवर मदतीला धावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

‘११२’ च्या कॉलवर मदतीला धावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

April 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वडगाव काटी येथे मध्यरात्री घरफोडी; पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

April 18, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

तेरखेड्यात बेकायदा तलवार बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा; येरमाळा पोलिसांची कारवाई

April 18, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

कळंब तालुक्यात संतापजनक घटना; चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

April 18, 2026
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

जन्मजात मृत स्त्री अर्भकाची कचऱ्याच्या पिशवीत विल्हेवाट; महिलेवर गुन्हा दाखल

April 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group