परंडा : फिर्यादी नामे- सुधाकर विठ्ठल शिंदे, वय 65 वर्षे, रा. देवगाव वस्ती आवारपिंपरी शिवार, ता. परंडा जि. धाराशिव यांच्या आवारपिंपरी शिवार शेत गट नं 78 मधील राहाते घरात आनेळखी चार इसम घुसुन सुधाकर शिंदे व त्यांची पत्नीस चाकुने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देवून त्यांचे अंगावरील व कपाटातील अंदाजे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 3,00,000₹ किंमतीचे हे दि. 09.10.2023 रोजी 22.30 वा. सु. जबरीने लुटुन नेले. अशा मजकुराच्या सुधाकर शिंदे यांनी दि.10.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 394, 457, 380अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे- आनंद बिरदीचंद बलाई, वय 51 वर्षे, रा. मेन रोड कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे मार्केट यार्ड कळंब येथील बिरदीचंद हारकचंद बलाई किराणा दुकानाची कुलुप अज्ञात व्यक्तीने दि. 03.10.2023 रोजी 20.30 ते दि. 04.10.2023 रोजी 09.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन गल्यामधील रोख रक्कम 4,95,000₹ चोरुन नेली. अशा मजकुराच्या आनंद बलाई यांनी दि.10.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 457, 380अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे- सुभाष शंकर क्षिरसागर, वय 65 वर्षे, रा. लहुजी चौक समोर येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांचे व तानाजी क्षिरसागर, आनंद खंडागळे यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 04.10.2023 रोजी 16.00 ते दि. 09.10.2023 रोजी 11.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन 52 इंची सोनी कंपनीची एलईडी टिव्ही, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, पितळी दोन घागरी, दोन हांडे, तीन तांबे, तानाजी क्षिरसागर यांचे रुममधील रोख रक्कम 17,000₹ व आनंद खंडागळे यांचे रुममधील रोख रक्कम 13,000₹असा एकुण 83,900₹ किंमतीचा माल हा चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुभाष क्षिरसागर यांनी दि.10.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 454, 457, 380अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :फिर्यादी नामे- मधुकर तुकाराम घोडके, वय 57 वर्षे, रा. महादेव गल्ली उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे उमरगा शिवार येथील गोठ्यात व आजुबाजुला ठेवलेले बोरची मोटार,बजाज कंपनीचे 99 पीव्हीसी पाईप, 1800 फुट केबल, 12 विळे, 40 पॉलिस्टर साड्या, पितळी घागरमाळे, पितळी साखळ्या, तुरदाळ, हरभरा दाळ, मुग दाळ, उडीद दाळ, गहु, ज्वारी असे एकुण- 58,130₹ किंमतीचा माल हा दि. 08.10.2023 रोजी 20.00 ते दि. 09.10.2023 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या मधुकर घोडके यांनी दि.10.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.