• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंबमध्ये दरोड्याचा मोठा डाव उधळला; १८ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल, १२ आरोपी निष्पन्न

admin by admin
March 13, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका मोठ्या टोळीचा डाव कळंब पोलिसांनी उधळून लावला आहे. या कारवाईत दोन तलवारी, लोखंडी गज आणि इतर घातक शस्त्रांसह तिखट पावडर जप्त करण्यात आली असून, तब्बल १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी १२ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. ही कारवाई गुरुवारी (ता. १२) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

कळंब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटेच्या सुमारास कळंब येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ काही जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आणि पूर्ण तयारीनिशी एकत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. यावेळी दरोड्याच्या उद्देशाने जमलेल्या या टोळीचा कट पोलिसांनी वेळीच हाणून पाडला.

या कारवाईदरम्यान दरोड्यासाठी आणलेले साहित्य पोलिसांना मिळून आले. यामध्ये दोन लोखंडी तलवारी, लोखंडी गज, लोखंडी रॉड, एक दोरी, दोन बॅटरी, डोळ्यात फेकण्यासाठी कॅरीबॅगमध्ये आणलेली तिखट पावडर आणि काळ्या रंगाचे हेक्झा ब्लेड असा एकूण १,८४५ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या आरोपींवर गुन्हा दाखल:

  • विश्वास ऊर्फ सगुना अशोक काळे (वय २०)

  • श्रीकांत ऊर्फ बबलु बापु पवार (वय २१)

  • विक्रम आप्पा पवार (वय २०)

  • दिपक ऊर्फे बब्बी विलास पवार (वय १९)

  • दिपक ऊर्फ आकड्या नितीन पवार (वय २०)

  • कालीदास ऊर्फ बापु फुलचंद काळे (वय १९)

  • सुरेश ऊर्फ आबा बापु पवार (वय २०)

  • तानाजी सुर्यभान पवार (वय ७०)

    (सर्व रा. कल्पना नगर पारधी पिढी, कळंब)

  • बालु ऊर्फ बालाजी शंकर पवार (वय २२, रा. शेही बाजार समोर, कळंब)

  • दिपक ऊर्फ बजरंग रवी काळे (वय २०, रा. जुनी दुध डेअरी, कळंब)

  • बड्या ऊर्फ महादेव कल्याण पवार

  • मुन्ना ऊर्फ पोपट सुभाष पवार (वय २९)

    (दोघे रा. कल्पना नगर पारधी पिढी, कळंब)

या १२ जणांसह इतर ६ अनोळखी इसमांवर (एकूण १८ जण) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) प्रभा दासराव पुंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी (ता. १२) कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१० (४), (५) सह शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

वाशी : शेंडी शिवारात दरोड्याचा डाव उधळला; पाच जणांच्या टोळीला बेड्या

Next Post

भूम : ऊसतोडीच्या उचलीवरून मारहाण; जाचाला कंटाळून मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

भूम : ऊसतोडीच्या उचलीवरून मारहाण; जाचाला कंटाळून मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!