धाराशिव : फिर्यादी नामे-ज्ञानदेव उर्फ बजराज श्रीमंतराव रणदिवे, वय 38 वर्षे, रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव हे दि.25.10.2023 रोजी 12.00 वा. सु. सारोळा बु. शिवारातील शेत गट नंबर 410 मध्ये ता. जि. धाराशिव येथे आरोपी नामे- खुशीदबी दादामियॉ शेख, वय 74 वर्षे रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव ह.मु. समर्थ नगर धाराशिव, 2) अशोक पंडीतराव रणदिवे, वय 42 वर्षे, रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव ह.मु. आर पी कॉलेज शेजारी धाराशिव 3)शब्बीर शहाबुद्दीन शेख रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव यांनी फिर्यादी यांचे शेतातील सोयाबीनच्या पिकाची लुटमार करुन पिकाचे नुकसान करुन काढणीस आलेले अंदाजे 35,000₹ किंमतीचे सोयाबीनचे पिक काढून घेवून गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्ञानदेव रणदिवे यांनी दि.11.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 392, 379, 441, 427, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे- भिमराव हणमंत पवार, वय 42 वर्षे, रा. साईधाम कॉलनी उमरगा प्रदीप टेकाळे यांचे घरी ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची होन्डा युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 24 बी.एच. 21.04 ही दि. 01.12.2023 रोजी 16.00 ते 18.00 वा. सु. विजय क्लिनिक उमरगा समोरील कंपांउंन्ड जवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भिमराव पवार यांनी दि.11.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
कळंब : आरोपी नामे-1) भागवत व्यंकटराव तिरुमले, वय 65 वर्षे, रा. बावी ता. वाशी जि. धाराशिव हे दि.11.12.2023 रोजी 21.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल ही सोनार लाईन ते डॉ बाबासाहेब अंबेउकर चौक कळंब येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
धाराशिव : आरोपी नामे-1)प्रशांत भागवतराव घोरपडे, वय 42 वर्षे, रा. विजय चौक जुनी गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.11.12.2023 रोजी 10.30 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा क्र एमएच 25 ए.के. 0150 हा बसस्थानक समोर धाराशिव येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.