• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, April 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चोरीची सुपारी घेणाऱ्या दलालास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे अभय

चोरावर मोर - भाग ३

admin by admin
December 14, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
चोरीची सुपारी घेणाऱ्या दलालास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे अभय
0
SHARES
491
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब – कळंब शहरातील सुपारी चोरीचा छडा आम्ही २४ तासात लावला, असे राणा भीमदेवी थाटात सांगणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस चोरावर मोर कसे ठरले, याची स्टोरी धाराशिव लाइव्हने प्रसिद्ध केल्यानंतर खा -की मधील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

कळंब शहरातील एका व्यापाऱ्याच्या गोडावूनमधून ४५ पोते सुपारी चोरीस गेली होती, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चोरीचा छडा लावून दोन चोरट्याना अटक केली आणि २३ पोते माल जप्त दाखवला आणि २२ पोते माल साडेपाच लाखास विकून स्थानिक गुन्हे शाखेचे दोन ते तीन पोलीस मालामाल झाले होते. नंतर कळंब पोलिसांनी २२ पैकी १५ पोते जप्त केला आहे. ज्यांच्याकडून माल जप्त केला , ते सांगत आहेत की, आम्ही पोलिसांकडूनच हा माल घेतला होता.

चोरावर मोर

कळंबमधील पारधी पेढीतील आरोपींनी काम करत असलेल्या मालकाकडून दोन ट्रॅक्टर आणून त्यावर डॉल्बी बसवून नाच केला, नंतर त्याच ट्रॅक्टर मध्ये चोरीचे ४५ पोते सुपारी बीड जिल्ह्यातील लाखा येथे नेला. तेथे ट्रॅक्टर मालकाच्या नातेवाईकास हा माल विकला होता, चोरीचा छडा लावणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४५ पोते माल ताब्यात घेतला असताना, २३ पोते दाखवून उर्वरित २२ पोते कळंबमधील मणियार आणि धारूर येथील शेख यास साडेपाच लाखास विकून चोरावर मोर ठरले.

चोरीचा सर्वप्रथम माल लाखा येथून जप्त करण्यात आला, चोरीचा माल घेणाऱ्या लाखा येथील दलालास आरोपी का केले नाही, त्यास अटक का केली नाही ? असा प्रश्न आहे. तसेच चोरीतील ट्रॅक्टर जप्त न करता, कालबाह्य झालेला जुना दुसराच ट्रॅक्टर दाखवला आहे, चोरीचा माल घेणाऱ्या आरोपीना अभय देताना त्यांच्यकडून सुद्धा पैसे उकळण्यात आले आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

काय आहे तक्रार ?

फिर्यादी नामे- महादेव मनोहरराव घुले, वय 60 वर्षे, रा. दत्तनगर कळंब ता. कळंब, जि. धाराशिव यांचे तांदुळवाडी रोड लगत रुणवाल बिल्डींग डिकसळ ता. कळंब येथील सुपारीचे गोडवुनचे शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.01.12.2023 रोजी 05.00 ते दि. 02.12.2023 रोजी 07.00 वा. सु.तोडून आत प्रवेश करुन गोडावून मधील सुपारीचे 45 पोते एकुण 16,60,125 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव घुले यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे गुरनं 506/2023 कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दोन आरोपीना अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चोरीचा छडा लावून याप्रकरणी दोन चोरट्याना अटक केली. दोन आरोपी कल्पनानगर पारधीपिढी येथे लपून बसले आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पोलीस पथकाने नमुद ठिकाणी जावून आरोपी नामे-1) शंकर मच्छिंद्र काळे, 2) श्रीकांत उर्फ बबलु बापु पवार दोघे रा. कल्पानगर, पारधी पिढी, कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना दि. 03.12.2023 रोजी कल्पना पारधी पिढीवरुन ताब्यात घेउन अधिक विचारपूस करता त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपी यांचे कडुन गुन्ह्यात चोरी गेलेल्या माला पैकी सुपारीचे 23 पोते,6,95,175 ₹ व निळ्या रंगाचे सोनालिका ट्रॅक्टर हेड क्र एमएच 13 BR 2587 असा एकुण 9,95,175 ₹ चा मुद्देमाल जप्त केला होता.

एका आरोपीची आत्महत्या

या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता पवार याने आत्महत्या केली आहे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी छळ केल्याने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, प्रेत कळंब पोलीस स्टेशनमध्ये आणून, जोपर्यंत पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंतविधी न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर प्रेत नेण्यात आले. परंतु त्याची निःपक्षपणे चौकशी होणार का ? हा प्रश्न आहे.

 

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल

Next Post

ढोकीजवळ दोन अपघातात दोन ठार, चार जखमी

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

ढोकीजवळ दोन अपघातात दोन ठार, चार जखमी

ताज्या बातम्या

कायदा हरला, लेकाचा ‘निकाल’ जिंकला! ८ वर्षांच्या पोराच्या एका वाक्याने आई-बापाचा ३ वर्षांचा ‘इगो’ एका सेकंदात ‘शून्य’

कायदा हरला, लेकाचा ‘निकाल’ जिंकला! ८ वर्षांच्या पोराच्या एका वाक्याने आई-बापाचा ३ वर्षांचा ‘इगो’ एका सेकंदात ‘शून्य’

April 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; पवनचक्कीचे ३६ लाखांचे नुकसान, तर बसस्थानकातून प्रवाशाचे ४३ हजार लांबविले

April 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

वृद्धेची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; निपाणी शिवारातील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

April 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group