ढोकी : मयत नामे-सुशीलकुमार आण्णासाहेब शिंदे, वय 35 वर्षे, सोबत संदिप भिमराव शिंदे, वय 45 वर्षे, दोघे रा. वाखरवाडी, ता. जि. धाराशिव हे दि.03.12.2023 रोजी 18.30 वा. सु. इंडीयन ऑईल लातुर रोड ढोकी च्या समोरुन मोटरसायकल क्र एमएच 25 डब्ल्यु 0344 यावरुन जात होते. दरम्यान कुबोटा ट्रॅक्टर क्र एमएच 25 बीए 0146 चा चालक आरोपी नामे- किरण दत्तात्रय वाघमारे रा. बाभळगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून सुशीलकुमार शिंदे यांचे मोटरसायकलला धडक दिली.
या अपघातात सुशीलकुमार शिंदे व संदीप शिंदे हे दोघे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- लालासाहेब गोविंद शिंदे, वय 51 वर्षे, रा. वाखरवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि.13.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : मयत नामे-शिवाजी मारुती भोसले, वय 65 वर्षे, रा. हिंगहजवाडी, ता. जि. धाराशिव हे दि.13.10.2023 रोजी 14.00 वा. सु. टमटम क्र एमएच 25 एफ 1702 मधून तेर ते हिंगळजवाडी जाणाऱ्या रोडवरुन प्रवास करत होते. दरम्यान टमटम क्र एमएच 25 एफ 1702 च्या चालकाने त्याचे ताब्यातील टमटम हा भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवल्याने टमटम पलटी होवून आपघात झाला.
या अपघातात मधील मयत नामे शिवाजी भोसले हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर इतर लोक हे किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा नामे- सतिश शिवाजी भोसले, वय 40 वर्षे, रा. हिंगळजवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि.13.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.