• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, January 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

श्रेयासाठी ‘कल्ला’ करणाऱ्यांनो, शेतकऱ्यांच्या पराभवावर ‘मूक गिळून’ का बसलात?

विजयाचे 'बाप' अनेक, मग पराभवाचे 'वारसदार' कोण?

admin by admin
November 27, 2025
in सडेतोड
Reading Time: 1 min read
श्रेयासाठी ‘कल्ला’ करणाऱ्यांनो, शेतकऱ्यांच्या पराभवावर ‘मूक गिळून’ का बसलात?
0
SHARES
79
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

यशाला अनेक बाप असतात, पण अपयश मात्र पोरके असते, याचा प्रत्यय सध्या धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याच्या मुद्द्यावरून येत आहे. खरीप २०२० च्या पीक विम्यातील प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग न्यायालयाच्या आदेशाने मोकळा झाला आणि लगेचच जिल्ह्य़ातील नेत्यांमध्ये “हे आम्हीच केले” असे सांगण्यासाठी अक्षरशः चढाओढ सुरू झाली. श्रेयासाठी धडपडणाऱ्या या मंडळींचा केविलवाणा प्रयत्न पाहून प्रश्न पडतो की, जेव्हा निकाल विरोधात जातात, तेव्हा ही मंडळी कोणत्या बिळात लपून बसतात?

खरीप २०२० मध्ये विमा कंपनीने तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली होती. ६३५ कोटी रुपये हक्काचे असताना केवळ ५६ कोटींचे तुकडे ७९ हजार शेतकऱ्यांच्या पदरात टाकून कंपनी मोकळी झाली होती. मात्र, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने कंपनीला गुडघे टेकावे लागले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दाखवलेला बाणा आणि न्यायालयाचा बडगा यामुळे आता जमा झालेले ७५ कोटी, त्यावरील ११ कोटींचे व्याज आणि शासनाकडील १३४ कोटी असा मोठा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. हा विजय निश्चितच मोठा आहे, पण त्याचे श्रेय घेण्यासाठी जे राजकीय पेढे वाटले जात आहेत, त्यामागील ढोंगीपणा आता उघडा पडला आहे.

आमचा सवाल या श्रेय लाटणाऱ्या नेत्यांना आहे की, अवघ्या महिनाभरापूर्वी खरीप २०२१ च्या प्रकरणात ३७४ कोटी रुपये मिळण्याचा निकाल जेव्हा विमा कंपनीच्या बाजूने लागला आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तेव्हा तुम्ही कुठे होतात? तेव्हा साधी निषेधाची एक फेसबुक पोस्ट लिहिण्याची धमक तुमच्यात का दिसली नाही? तेव्हा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून आवाज का उठवला नाही? विजयाचे श्रेय घ्यायला पुढे येणारे हात, पराभवाच्या वेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला का पुढे आले नाहीत?

केवळ श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. खरीप २०२२ च्या पंचनाम्यांच्या प्रतींचा मुद्दा तर प्रशासकीय नाकर्तेपणाचा कळस आहे. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचे आदेश आहेत, तरीही पंचनाम्यांच्या प्रती मिळत नाहीत. जर या प्रती मिळाल्या, तर जिल्ह्याला ६०० कोटी रुपये मिळू शकतात. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे, ‘डबल इंजिन’चे सरकार आहे, तरीही शेतकऱ्यांना हक्काच्या कागदपत्रांसाठी झगडावे लागत असेल, तर या नाकर्तेपणाचे श्रेय कोण घेणार?

शेतकरी नेते अनिल जगताप यांनी पाठपुरावा करून व्याजापोटी ४२ कोटी रुपये मंजूर करून दीड वर्ष झाले. जिल्हा अधीक्षकांचे पत्र जाऊनही विमा कंपनी पैसे देत नसेल, तर या कंपनीवर कुणाचाच अंकुश नाही का? प्रशासन हतबल आहे की कंपनीला पाठीशी घालत आहे? ४२ कोटींचे व्याज मिळत नाही, याचे ‘श्रेय’ घ्यायला कोणताही नेता पुढे का येत नाही?

धाराशिवचा शेतकरी आता दूधखुळा राहिलेला नाही. कोण फक्त हवेत गप्पा मारतय आणि कोण जमिनीवर राहून संघर्ष करतय, हे त्याला पक्के कळते. निकाल लागला की फोटो काढून झळकणाऱ्यांनो लक्षात ठेवा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सोयीस्कर मौन पाळले तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. विजयाचे श्रेय घेताय ना? मग प्रलंबित ६०० कोटी आणि गमावलेल्या ३७४ कोटींच्या अपयशाची जबाबदारी घेण्याची हिंमतही दाखवा!

– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह

Previous Post

ब्रेकिंग न्यूज: धाराशिव हादरले! रुई (ढोकी) रेल्वे फाटकाजवळ तरुणीचा जाळून खून; मृतदेहाचा झाला कोळसा

Next Post

मसला खुर्द येथील शासकीय सभागृह पाडकाम प्रकरण: दोन महिने उलटूनही कारवाई शून्य; प्रशासनाचा दोषींना ‘वरदहस्त’?

Next Post
मसला खुर्द येथील शासकीय सभागृह पाडकाम प्रकरण: दोन महिने उलटूनही कारवाई शून्य; प्रशासनाचा दोषींना ‘वरदहस्त’?

मसला खुर्द येथील शासकीय सभागृह पाडकाम प्रकरण: दोन महिने उलटूनही कारवाई शून्य; प्रशासनाचा दोषींना 'वरदहस्त'?

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी भाजप सज्ज; तिकिटासाठी इच्छुकांची मांदियाळी, तब्बल ७१२ अर्ज दाखल

January 16, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा शहरात निवडणुकीच्या वादातून राडा; तरुणासह पुतण्यावर लोखंडी रॉडने हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल

January 16, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वडगाव (ज) येथे भररस्त्यात तलवारीसह फिरणाऱ्या तरुणावर कारवाई

January 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच; चार ठिकाणी घरफोडी व चोऱ्या, ३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास

January 16, 2026
धाराशिव: व्याजाच्या पैशांच्या वादातून तरुणांनी लुटले सावकाराचे घर

धाराशिव: व्याजाच्या पैशांच्या वादातून तरुणांनी लुटले सावकाराचे घर

January 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group