धाराशिव : बनावट दस्तऐवज तयार करुन,बनावट शपथपत्र बनवून, त्यावर फिर्यादीचे बनावट स्वाक्षरी करुन फिर्यादीने तक्रार मागे घेतल्या बाबतचा खोटा जबाब तयार करुन पोलीस पाटील पदाला मुदतवाढ देण्यास योग्य असल्याचा अहवाल दिल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्यासह चार जणांवर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे- डॉ. योगेश खरमाटे, उपविभागीय अधिकारी , उपविभाग कार्यालय धाराशिव, 2) एच.एस कुदळे, मंडळ अधिकारी अंबेजवळगा, 3) जी. आर. शिंदे, तलाठी सज्जा शिंगोली, 4) चंद्रकांत पाटील पोलीस पाटील रा. शिंगोली ता. जि. धाराशिव यांनी दि. 14.02.2023 रोजी ते दि. 17.01.2024 रोजी पावेतो उपविभागीय अधिकारी कार्यालय धाराशिव येथे फिर्यादी नामे- गणेश शिवाजी जाधव, वय 33 वर्षे, रा. बरमगाव (बु) ता. जि. धाराशिव यांचे नावाचे बनावट दस्तऐवज तयार करुन,बनावट शपथपत्र बनवून, त्यावर फिर्यादीचे बनावट स्वाक्षरी करुन फिर्यादीने तक्रार मागे घेतल्या बाबतचा खोटा जबाब तयार करुन पोलीस पाटील पदाला मुदतवाढ देण्यास योग्य असल्याचा अहवाल मा. तहसिलदार सो यांनी सुनावणी घेतल्यांनतर तहसिलदार यांना आधारकार्डमध्ये व स्वाक्षरी मध्ये तफावत दिसून आल्याचा अहवाल सादर केला. उपविभागीय अधिकारी यांनी अहवाल सादर केल्यानंतर त्यांनी संबंधीत व्यक्तीवर तक्रार देणे किंवा तक्रार देण्यास प्राधिकृत करणे योग्य असतानाही नमुद आरोपी यांना पठीशी घालून व त्याचेशी संगणमत करुन फिर्यादी व तहसिल कार्यालयाची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणेश जाधव यांनी दि.26.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 420, 468, 471, 120(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.