ढोकी : फिर्यादी नामे-काका देविदास यादव, वय 41 वर्षे, रा. गोरोबा गल्ली, तेर, ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची सिडी हॅड्रेड कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 20 ए 1411 ही दि. 12.01.2024 रोजी 21.00 ते 23.40 वा. सु. काका यादव यांचे राहात्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- काका यादव यांनी दि.13.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : दि.06.01.2024 रोजी 06.00 ते दि. 07.01.2024 रोजी 07.30 वा. सु. सरकारी दवाखाना धाराशिव येथील नविन इमारतीच्या तळमजल्यावरील ऑक्सिजन प्लॅन्टवरील ताब्यांचे पाईप अंदाजे 10,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- इद्रमोहन सदाशिव मेंढेकर, वय 60 वर्षे, व्यवसाय- नोकरी सरकारी दवाखाना धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.13.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : फिर्यादी नामे-विवेकानंद हरीदास मुदगुडकर, वय 40 वर्षे, रा. रुईभर ता. जि. धाराशिव हे दि. 08.01.2024 रोजी बेंबळी आठवडी बाजार येथे बाजार घेत असताना त्यांचे पॅन्टचे खिशातील अंदाजे 21,999 ₹ किंमतीचा वन प्लस नॉर्ड 03 कंपीनचा मोबाईल आय एम ई आय नं. 862529063433473 असा असलेला अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विवेकानंद मुदगुडकर यांनी दि.13.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : फिर्यादी नामे-संकेत कमलाकर रवळे, वय 23 वर्षे, रा. उंडरगाव ता. लोहारा जि. धाराशिव यांचे उंडरगाव शिवारातील शेत गट नं. 28 मधून ट्रॅक्टरचा लोकनेते कंपनीचा लोखंडी नांगर अंदाजे 25,000₹ किंमतीचा हा दि.03.01.2024 रोजी 19.00 ते 21.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संकेत रवळे यांनी दि.13.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.