धाराशिवच्या जिल्हाधिकारी पदाची केवळ प्रशासकीय महत्त्वाची भूमिका नाही, तर ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीच्या सेवेसाठी असलेली सर्वोच्च जबाबदारी आहे. त्यामुळे या पदावर बसणारा अधिकारी केवळ एक प्रशासक नसून, तो आई तुळजाभवानीचा व्यवस्थापक आणि भक्तांसाठी न्यायाधीश असतो.
तुकाराम मुंढे – धाराशिवसाठी सर्वोत्तम पर्याय का?
✔ ते वरिष्ठ IAS अधिकारी असले तरी पदाच्या कनिष्ठ-वरिष्ठतेपेक्षा इमानदारी महत्त्वाची!
✔ स्वच्छ आणि पारदर्शक व्यवस्थापनासाठी त्यांची देशभर ओळख आहे.
✔ त्यांनी देवस्थानांचे व्यवस्थापन कसे करावे, याचे उत्तम उदाहरण जाळले आहे.
त्यामुळे केवळ प्रशासनिक दृष्टिकोनातून विचार करण्यापेक्षा धाराशिवच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वाचा विचार करूनच तुकाराम मुंढे यांची नेमणूक होणे गरजेचे आहे.
आषाढी-कार्तिकी एकादशीच्या वेळी मुंढेंनी दाखवलेले कर्तृत्व!
महाराष्ट्रात अनेक IAS अधिकारी आले आणि गेले. पण ‘विठुरायाच्या पंढरीत’ आषाढी-कार्तिकी वारी शिस्तबद्ध आणि भ्रष्टाचारमुक्त फक्त तुकाराम मुंढेंच्या काळात पाहायला मिळाली!
🔹 वारीत स्वच्छतेचे कठोर नियम लागू करून लाखो वारकऱ्यांसाठी आदर्श सेवा दिली.
🔹 वारकऱ्यांना विठुरायाचे खरे दर्शन घडवण्यासाठी शासन-प्रशासनाला प्रभावीपणे हाताळले.
🔹 देवस्थान व्यवस्थापनात पारदर्शकता आणून ‘देवधर्माच्या नावाखाली’ होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घातला.
त्यांनी देवस्थानाच्या व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण घालून दिले. त्यामुळेच आता महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या विकासासाठीही तेच हवेत!
२,००० कोटींच्या तुळजापूर विकास योजनेत पारदर्शकता हवी!
तुळजापूरचा विकास करण्यासाठी शासनाने २,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पण हा निधी कोणाच्या हाती जातोय, यावर तुळजापूरचा विकास ठरणार आहे की घोटाळा?
🔥 हा पैसा मंदिराच्या विकासासाठी वापरणार का ‘मॅनेजमेंट’मध्ये हडप होणार?
🔥 तुळजाभवानी मातेचे मंदिर जागतिक दर्जाचे होणार की फायलीत अडकणार?
🔥 खऱ्या भक्तांसाठी सेवा वाढणार की पुन्हा दलालीचं जाळं?
जर तुळजापूरचा विकास हा खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचा करायचा असेल आणि यामध्ये भ्रष्टाचार टाळायचा असेल, तर शासनाला अपवादात्मक परिस्थितीत कणखर निर्णय घ्यावे लागतील.
आणि तो सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे – धाराशिवच्या जिल्हाधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करणे!
बीड सुधारण्यासाठी सरकारने कंबर कसली, मग धाराशिवसाठी का नाही?
महाराष्ट्र सरकारने बीड जिल्ह्याचा ‘गुन्हेगारी हब’ हा ठपका पुसण्यासाठी पालकमंत्री बदलून विशेष लक्ष दिलं आणि इमानदार अधिकारी नवनीत कॉवत यांची जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली.
✅ या बदलामुळे बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा झाली.
✅ भ्रष्टाचार्यांवर कारवाई होऊ लागली.
✅ आता बीड पुन्हा नव्या उमेदीने उभं राहत आहे.
➡ जर बीड सुधारू शकतं, तर धाराशिवही सुधारणं गरजेचं नाही का?
➡ धाराशिवचा ‘बीड’ होऊ द्यायचा नसेल, तर शासनाने इमानदार आणि कणखर अधिकारी नियुक्त करण्याचा धाडसी निर्णय घ्यायला हवा.
➡ आणि धाराशिवला जर खरंच भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाच्या मार्गावर न्यायचं असेल, तर तुकाराम मुंढे शिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही!
धाराशिवकर, तुमचं मत काय?
✅ तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाली, तर धाराशिवचा कायापालट होईल का?
✅ तुळजापुरच्या मंदिराचा विकास हा भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक होईल का?
✅ की पुन्हा एकदा राजकीय लॉबी कोणता ‘मॅनेजेबल’ जिल्हाधिकारी आणणार?
➡️ तुमचं मत खालील कमेंटमध्ये लिहा आणि या मोहिमेचा आवाज वाढवा!