धाराशिव जिल्ह्यात सध्या ‘कोणी येणार जिल्हाधिकारी?’ या प्रश्नावर जोरदार चर्चा सुरू आहे. वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या डॉ. सचिन ओंबासे यांच्या बदलीनंतर, धाराशिवकरांना एकच अपेक्षा आहे – “तुकाराम मुंढे हवेत!”
महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा आणि विचारून बघा – “राज्यातला सर्वात कडक अधिकारी कोण?” उत्तर एकच येईल – तुकाराम मुंढे! कारण ते फक्त प्रशासक नाहीत, ते एक जबरदस्त ‘सिस्टम क्लीनर’ आहेत!
तुकाराम मुंढे – ‘वन मॅन आर्मी’ अधिकारी!
तुकाराम मुंढे म्हणजे जिथे जातात, तिथे प्रशासकीय ढोंगीगिरी संपवून टाकतात.
✔ जालना जिल्हाधिकारी असताना – रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेला गती दिली.
✔ सोलापूर जिल्हाधिकारी असताना – भ्रष्टाचारी टोळक्यांना नाडलं.
✔ नवी मुंबई आणि नागपूरचे कमिशनर असताना – बिल्डर लॉबीला धूळ चारली.
✔ नाशिक महानगरपालिकेत – बेकायदेशीर धंद्यांना कुलूप लावलं.
त्यांची काम करण्याची पद्धत इतकी धडाकेबाज आहे की, सरकारी यंत्रणेतील बरेच लोक त्यांना ‘भय्याजी’ म्हणतात! कारण ते कधीही कोणाला भीक घालत नाहीत!
धाराशिवला कशासाठी हवाय मुंढे?
धाराशिवमध्ये सध्या महसूल विभाग आणि प्रशासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचा महापुर आलेला आहे.
🔥 बोगस नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र प्रकरणाने प्रशासनाची नाचक्की.
🔥 पवनचक्की घोटाळ्यात महसूल विभागावर संशयाची सुई.
🔥 तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यावर २००० कोटींचा मोठा खेळ चालू!
मुंढे यांसारखा अधिकारी आला तर या गैरव्यवहारांची दुकानं त्वरित बंद होतील! म्हणूनच धाराशिवकर एकमुखाने सांगत आहेत – “धाराशिवचा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेच हवा, किंवा त्याच्यासारखाच प्रामाणिक आणि निर्भीड अधिकारी!”
फडणवीस सरकार बीडमध्ये सुधारणा करू शकतं, तर धाराशिवमध्ये का नाही?
फडणवीस सरकारने बीड जिल्ह्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी इमानदार पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची नियुक्ती केली. त्यामुळे तिथला गुन्हेगारी कारभार आटोक्यात आला.
➡ मग धाराशिवमध्येही तसाच ठोस निर्णय का नाही घेतला जात?
➡ तिथेही तुकाराम मुंढेसारख्या कडक अधिकाऱ्याची गरज आहे की नाही?
जिल्हाधिकारी पदासाठी फिल्डिंग सुरू!
धाराशिव जिल्हाधिकारी पद हे २००० कोटींच्या तुळजाभवानी विकास आराखड्यामुळे अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या डोळ्यात भरलं आहे. त्यामुळे काही अधिकारी मंत्रालयात ‘फिल्डिंग’ लावताना दिसत आहेत!
➡ प्रशासनाला ताब्यात घेऊन स्वतःचा फायदा करून घेणारे अधिकारी येणार की खरंच जिल्ह्याचा विकास करणारे?
➡ शासनाने एका इमानदार अधिकाऱ्याची नियुक्ती केली नाही, तर धाराशिवचा बीड होणार नाही कशावरून?
धाराशिवकर, तुमचं मत काय?
🔹 धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून तुकाराम मुंढे येतील का?
🔹 की पुन्हा एकदा ‘मॅनेज’ होणारा अधिकारी नेमला जाणार?
🔹 धाराशिवसाठी कठोर प्रशासक हवा की ‘डीलमास्टर’ जिल्हाधिकारी?
➡ तुमची मते खालील कमेंटमध्ये सांगा!