• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चोरीचा खोटा आळ आणून बदनामी केल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; बावी येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 26, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम : मोटार चोरीचा खोटा आळ आणून, व्हिडिओ काढून बदनामी केल्याच्या त्रासाला कंटाळून एका ४१ वर्षीय व्यक्तीने चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील बावी येथे घडली आहे. याप्रकरणी मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात गावातीलच पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास काशीनाथ भोसले (वय ४१, रा. अंबिका नगर, बावी, ता. भूम, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

व्हिडिओ काढून केली बदनामी

मिळालेल्या माहितीनुसार, १८ मे २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास बावी शिवारातील विश्वनाथ भोसले यांच्या शेतात विलास भोसले यांनी चिंचेच्या झाडाला गळफास घेतला. आरोपींनी विलास भोसले हे तळ्यातील पाण्याची मोटार घेऊन जात असतानाचे छायाचित्रीकरण (व्हिडिओ) केले होते. हा व्हिडिओ इतरांना दाखवून ‘विलास यांनी मोटार चोरी केली आहे’ असे सांगत त्यांची परिसरात मोठी बदनामी केली. या खोट्या आरोपामुळे आणि मानसिक त्रासाला कंटाळून विलास भोसले यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पाच जणांवर गुन्हे दाखल

याप्रकरणी मयताचा मुलगा प्रसाद विलास भोसले (वय २२, रा. अंबिका नगर, बावी) याने २५ मे रोजी भूम पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी:

१. विश्वनाथ दिगंबर भोसले

२. लालू प्रकाश भोसले

३. प्रकाश विश्वनाथ भोसले

४. बाबू मारुती पिंपळे

५. उमेश रोहिदास राऊत (सर्व रा. बावी, ता. भूम)

या पाचही जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३५६ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.

Previous Post

रांजणीत सालगड्यानेच केला विश्वासघात; मालकाचे सव्वाचार लाख रुपये घेऊन पोबारा

Next Post

शेतातील आंबे नेल्याच्या कारणावरून वृद्ध वडिलांना लोखंडी गजाने अमानुष मारहाण; आनंदनगर पोलिसांत मुलावर गुन्हा दाखल

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

शेतातील आंबे नेल्याच्या कारणावरून वृद्ध वडिलांना लोखंडी गजाने अमानुष मारहाण; आनंदनगर पोलिसांत मुलावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!

 तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!

October 15, 2026
साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?

October 14, 2026
संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

October 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास

October 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक

October 14, 2026

Recent Posts

  •  तुळजाभवानीच्या दरबारात वशिलेबाजीचा ‘मटका’; सत्ताधाऱ्यांच्या लाडक्यांचा नंगानाच!
  • ‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?
  • संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
  • भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास
  • सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!