• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा परिषदेतील वाहने विना परवाना चालतात रस्त्यावर !

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे सर्व वाहनांची नोंद ... प्रभारी उप अभियंता शिंदे कारभारी !

admin by admin
July 11, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्हा परिषदेतील वाहने विना परवाना चालतात रस्त्यावर !
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या परिषदेमध्ये अनेक कामांचा अनियमित कारभार सुरू असून यामधील एका अनियमित कारभाराचे दप्तरच हाती लागले आहे. विशेष म्हणजे या वाहनांना रस्त्यावर चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या परवान्यापैकी एकही परवाना २०२२ पासून आजपर्यंत काढलेला नाही किंवा त्याची पूर्तता देखील केलेली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परस्परच अनधिकपणे समक्ष मान्यता न घेता ती वाहने मनमानीपणे संबंधित पंचायत समितीला वर्ग करण्याचा महाप्रताप प्रभारी उप अभियंता असलेल्या …स्वयंघोषित…कारभाऱ्यांने बिनधास्तपणे केला आहे.

धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंचायत समिती कार्यालयातील यांत्रिकी उपविभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या हात पंप देखभाल दुरुस्ती पथकासाठी वाहने आहेत. पंचायत समितीची सर्वे वाहने ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. त्यामुळे ती वाहने इतर विभागाकडे देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समक्ष मान्यता घेणे गरजेचे आहे. मात्र प्रभारी उप अभियंता एस.पी. शिंदे यांनी आपल्या सहीने वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये अनाधिकृतपणे समक्ष मान्यता न घेता वापर केलेला आहे.

ही सर्व वाहने पंचायत समिती कार्यालयातील यांत्रिकी उपविभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या हातपंप देखभाल दुरुस्तीसाठी वापरली जातात. या वाहनांमध्ये जिल्ह्यातील पंचायत समिती यांचा समावेश आहे.

हात पंप दुरुस्तीसाठी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीची बोलेरो कम्पर 2WDPS GOODS CARRIER (LGV) या माल वाहतूक वाहनांचे इन्शुरन्स (विमा), फिटनेस प्रमाणपत्र, पीयूसी, वाहनांच्या मंजुरीचे आदेश, वाहनांचे लॉक बुक आदी असणे अत्यंत गरजेचे आहे. जर यापैकी एकही प्रमाणपत्र नसेल तर ते वाहन रस्त्यावर उतरविले जाऊ शकत नाही. जर रस्त्यावर वाहन उतरविले तर संबंधितावर कारवाई केली जाते. मात्र जिल्हा परिषदेच्या ताब्यात व वापरात असलेल्या वाहनांची २०२२ पासून आजपर्यंत वरीलपैकी कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. तसेच वाहन वाहतूक नियमांचे पालन केलेले दिसून येत नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कोणावर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील ही वाहने असून यामध्ये धाराशिव – एमएच २५ – ४०२८, तुळजापूर – एमएच २५ – ४०२९, वाशी – एमएच २५ – ४०३०, कळंब – एमएच २५ – ४०३१, भूम आणि उमरगा – एमएच २५ – ४०३२ व एमएच २५ – ४०३३ या वाहनांचा समावेश आहे.

Previous Post

धाराशिव शहरात महिला असुरक्षित

Next Post

गुरुवर्य के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा पोलीस बंदोबस्तात काढा

Next Post
के.टी. पाटील अनधिकृत पुतळा प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला आ. चौगुले यांचा ‘खो’

गुरुवर्य के.टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा पोलीस बंदोबस्तात काढा

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026

Recent Posts

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!