धाराशिव : धाराशिव शहरात सध्या महिला असुरक्षित आहेत. दिवसाढवळ्या मंगळसूत्र ओढून नेण्याचे प्रकार वाढले असताना पोलीस थंड आहेत.शहर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हप्ता वसुलीत दंग आहेत. त्यामुळे चोर निर्ढावले आहेत.
फिर्यादी नामे-साधना अभिजित धाबेकर, वय 35 वर्षे, गांधीनगर धाराशिव ता. जि. धाराशिव या दि. 09.07.2024 रोजी 12.30 वा. सु.समर्थ मंगल कार्यालय येथे लग्नासाठी स्कुटीवरुन जात असताना गांधीनगर धाराशिव येथील लाईफ केअर हॉस्पीटल धाराशिव समोरील रोडवरुन जात असताना त्यांचे पाठीमागून येणारे मोटरसायकल चालकाने साधना धाबेकर यांचे स्कुटीसमोर येवून त्यांचे गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण अंदाजे 80,000₹ किंमतीचे जबरीने हिसकावून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-साधना धाबेकर यांनी दि.09.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 309(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिवमध्ये घरफोडी
धाराशिव : फिर्यादी नामे-सतिष पांडुरंग भोसले, वय 58 वर्षे, रा. तांबरी विभाग, ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.07.07.2024 रोजी 19.30 ते दि. 08.07.2024 रोजी 07.45 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 23 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम 45,000₹, तसेच गल्लीतील माया रमेश रसाळ यांचे ही राहते घराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करुन सुटकेस मधील रोख रक्कम 10,000₹ असा एकुण 1,25,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सतिष भोसले यांनी दि.09.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या
कळंब : फिर्यादी नामे-राहुल भगवानराव कवडे, वय 45 वर्षे, रा. शिवाजीनगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे सोनार लाईन कळंब येथील कवडे ज्वेलर्स मधील वरच्या दुकानाच्या दरवाज्याची कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.08.07.2024 रोजी 23.30 ते दि. 09.07.2024 रोजी 08.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन दुकानातील स्टीलचया पेटीचे लॉक तोडून 11 तोळे सोन्याचे दागिने एकुण 7,99,500₹ किंमतीचे, तसेच विक्रम मोहन चोंदे रा. चोंदे गल्ली कहंब यांचे मन्मथ स्वाती चौक येथील ईश्वरी किराणा भुसार दुकानाचे शटरचे लॉक तोडून कॅश काउंटरमधील ठेवलेले रोख रक्कम 29,000₹, तसेच विश्वतील मधुकर बोराडे यांचे देशी दारुचे दुकानाचे शटरचे लॉक तोडून कॅश काउंटरमधील 9,500₹ असे एकुण 8,38,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राहुल कवडे यांनी दि.09.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : फिर्यादी नामे-विशाल अंबादास कडबणे, वय 33 वर्षे, रा. सोमवार गल्ली परंडा जि. धाराशिव यांचे अंदाजे 25, 000₹ किंमतीचे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व कलीम अतारउर रहेमान मुजावर यांचे ही रोख रक्कम 3,000₹ हे दि. 08.07.2024 रोजी 02.00 वा. सु. सोमवार गल्ली परंडा येथुन आरोपी नामे- कृष्णा मच्छिंद्र घुले रा. सोमवार गल्ली परंडा यांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विशाल कडबणे यांनी दि.09.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे-उध्दव सोपान शिनगारे, वय 54 वर्षे, रा. पारा ता. वाशी जि. धाराशिव यांची अंदाजे 23,000₹ किंमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 ए.एफ 8326 ही दि. 07.07.2024 रोजी सायंकाळी 05.30 वा. सु. वाशी येथील आठवडी बाजार येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-उध्दव शिनगारे यांनी दि.09.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.