धाराशिव :आरोपी नामे-1)जहीरोद्दीन नसरोद्दीन शेख, 2) मिन्हाजोद्दीन खलियोद्दीन काझी, 3) जाएद बुरहानोद्दीन काझी, 4) वलियोद्दीन नसरोदृदीन काझी, 5) हफिज वलीयोद्दीन काझी, 6) वलीयोद्दीन नसरोद्दीन काझी, 7) बुरहानोद्दीन नसरोद्दीन काझी, 8) राकेब वलीयोद्दीन काझी, 9) निजामोद्दीन नसीरोद्दीन काझी सर्व रा. लोहारा गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 02.02.2024 रोजी एस के राईस सेंटर तांबरी विभाग धाराशिव येथे फिर्यादी नामे-शमशोद्दीन नसरोद्दीन काझी, वय 63 वर्षे, रा. तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव यांना जागेच्या वादाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने डोक्यात मारुन फॅक्चर करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शमशोद्दीन काझी यांनी दि.05.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 143, 147, 148, 149, 325 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे-1) प्रविण बाळु बनसोडे, रा. साठेनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.05.02.2024 रोजी 16.00 वा. सु. साठेनगर धाराशिव येथे फिर्यादी नामे- मेनका बापु शिंदे, वय 29 वर्षे, रा. साठेनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांना घराचे वादाचे कारणावरुन नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बारीक कैचीने डावे डोळ्याजवळ व डोक्यावर मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मेनका बापु शिंदे यांनी दि.05.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.द.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे-1)राम सैदा गायकवाड रा. बॅक कॉलनी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 05.02.2024 रोजी 17.30 वा. सु. तहसिल कार्यालय उमरगा चे गेटचे बाजूला उमरगा येथे फिर्यादी नामे-बाबुराव माणिकराव गायकवाड, वय 55 वर्षे, रा. एकोंडी रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मुलाचे शिक्षणासाठी घेतलेले दोन लाख् रुपये का देत नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने डोक्यात मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाबुराव गायकवाड यांनी दि.05.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरोपी नामे-1)दिनेश नागेंद्र गिरी, 2) सावित्री दिनेश गिरी,3) बाई नागेंद्र गिरी सर्व रा. वाणेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 03.02.2024 रोजी 17.30 वा. सु. शेता गट नं 83 मध्ये वाणेगाव शिवार येथे फिर्यादी नामे- ज्ञानेश्वर तुकाराम गिरी, वय 20 वर्षे, रा. वाणेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेत रस्त्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने माराहण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्ञानेश्वर गिरी यांनी दि.05.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघात
तामलवाडी : फिर्यादी नामे- रोहीत उर्फ शाम कृष्णाथ सरवळे, वय 26 वर्षे, व सोबत मयत नामे- हेमंत संजय कुंभार, वय 23 वर्षे दोघे ही रा. कासेगाव ता. द. सोलापूर जि. सोलापूर, हे दोघे दि.04.02.2024 रोजी 14.45 वा. सु. शिवा गुंड यांचे आंब्याचे बागेजवळ सुरतगाव शिवार येथुन मोटरसायकल क्र एमएच 13 बीएम 9926 वर बसून जात होते. दरम्यान आयशर टेम्पो क्र एमएच 13 डीक्यु 2763 चा चालकाने त्याचे ताब्यातील आयशर टेम्पो हा हायगई व निष्काळजीपणे चालवून रोहीत सरवळे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात रोहीत सरवळे हे गंभीर जखमी झाले. तर हेमंत संजय कुंभार हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रोहीत सरवळे यांनी दि.05.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह मोवाका कलम 134 अ, ब, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.