• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात ३ जून २०२५ पर्यंत ‘नो फ्लाइंग झोन’ घोषित

 दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

admin by admin
May 16, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात ३ जून २०२५ पर्यंत ‘नो फ्लाइंग झोन’ घोषित
0
SHARES
1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: भारतीय लष्कराने राबवलेल्या “ऑपरेशन सिंदूर” मोहिमेनंतर दहशतवादी संघटनांकडून संभाव्य ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात ३ जून २०२५ पर्यंत ‘नो फ्लाइंग झोन’ (No Flying Zone) घोषित करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

भारतीय लष्कराने ऑपरेशन ‘सिंदुर’ अंतर्गत देशविघातक संघटनांचे – जैश-ए-मोहम्मद (JEM), लष्कर-ए-तय्यबा (LET) आणि हिजबुल मुजाहिदीन (HM) – तळ उद्‌ध्वस्त केले असून,या कारवाईचा सूड घेण्यासाठी दहशतवादी संघटनांनी ड्रोनद्वारे हल्ल्यांची शक्यता वर्तवली आहे. या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्ह्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशानुसार, ३ जून २०२५ पर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे ड्रोन, रिमोट नियंत्रित मायक्रो एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर्स, हँग ग्लायडर्स, हॉट एअर बलून आणि तत्सम कोणतीही हवेत तरंगणारी वस्तू उडवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि सुरक्षाविषयक तातडीची गरज लक्षात घेता, सर्व संबंधितांना नोटीस देऊन आदेश काढण्यास पुरेसा अवधी नसल्याने हा एकतर्फी आदेश काढण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा संघटनांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी या आदेशाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

धाराशिव : प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देऊन वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरण: माजी उपसभापती शरद जमदाडे याला बेड्या …

Next Post
तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरण: माजी उपसभापती शरद जमदाडे याला बेड्या …

तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरण: माजी उपसभापती शरद जमदाडे याला बेड्या ...

ताज्या बातम्या

धाराशिव जनता बँकेच्या ७ संचालकांना हटवण्याचे आरबीआयचे निर्देश; सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

धाराशिव जनता बँकेच्या ७ संचालकांना हटवण्याचे आरबीआयचे निर्देश; सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

June 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात एअर पिस्टल बाळगणाऱ्या चौघांवर गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र! केबल, दुचाकीसह ३ लाखांची ॲल्युमिनियम तार लंपास; चार पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात ज्येष्ठ दाम्पत्याला लोखंडी रॉड अन् सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण; ६ जणांवर अट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘माझा संसार का मोडलास?’ म्हणत जावयाचा सासूवर जीवघेणा हल्ला; लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर येथील घटना

June 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group