धाराशिव : मिरवणुकीमध्ये डॉल्बी डिजेचा आवाज ध्वनी तीव्रतेपेक्षा व कर्णकर्कश ठेवून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्येगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-1)अक्षय बलभिम साळुंके, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव जि. धाराशिव यांनी दि. 09.05.2024 रोजी 17.00 ते 21.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे श्री. महाराणा प्रताप जयंती मिरवणुकी मध्ये लावलेले वाद्य हे पारंपारिक पध्दतीने किंवा पोलीसांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे न लावता डॉल्बी डिजे लावून आदेशाचे उल्लघंन केले. तसेच लोकसेवक पो स्टे प्रभारी अधिकारी यांनी दिलेले सीआरपीसी कलम 149 प्रमाणे नोटीसचे आदेशाचे जाणीवपुर्वक अवज्ञा केली. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि.सं. कलम-188, अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र गुन्हे नोंदविले आहेत.
जेवळीत खून
लोहारा : मयत आरोपी नामे-व्यंकट बाबु विभुते रा. जेवळी उत्तर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.27.04.2024 रोजी 22.00 ते दि. 28.04.2024 रोजी 06.45 वा. सु. जेवळी येथे मयत नामे- मिना व्यंकट विभुते, वय 35 वर्षे, रा. जेवळी या व नमुद मयत आरोपी हे पती पत्नी असुन आरोपीने मयत मिना हिस राहते घरी झोपडीत तिचे अनैतिक संबंध असलेबाबत संशय घेवून दोरीने गळा आवळुन जिवे ठार मारुन स्वत: गळफास घेवून मयत झाला आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गोविंद रामल्लु कल्यामोळ, वय 19 वर्षे, रा. जेवळी उत्तर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.09.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे 302 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.