• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू – गरिबांवर कारवाई, श्रीमंत मात्र सुटले

admin by admin
January 31, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात अतिक्रमणांवर बुलडोझर
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असले तरीही अनेक समस्या असलेल्या ‘सुधारित खेड्या’सारखेच आहे. येथील शासकीय आयुर्वेदिक कॉलेज ते तेरणा कॉलेज या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम गुरुवारपासून सुरू झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कारवाई हाती घेतली आहे.

सरकारी जागेवर खासगी गोरखधंदे

दूध डेअरी ते साठे चौक या परिसरात तर परिस्थिती आणखीनच गंभीर आहे. येथे सरकारी जागांवर पत्र्याचे शेड उभारून त्या जागा भाड्याने दिल्या जात आहेत. हा बेकायदेशीर गोरखधंदा प्रशासनाच्या नजरेआड सुरू आहे. मात्र, अचानक ही कारवाई का सुरू झाली, यामागे वेगळेच कारण असल्याचे बोलले जात आहे.

अतिक्रमण हटवण्याची मोहीम की वरवरची मलमपट्टी?

शहरातील या मुख्य रस्त्यावर नाले नाहीत किंवा अस्तित्वातील नाले तुंबले आहेत. त्यामुळे नालीबांधणीसाठी कोट्यवधी  रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (अधिकृत आकडेवारी देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत ) हा निधी वापरण्यासाठीच अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, एकदा नाली बांधली की, त्यावर पुन्हा अतिक्रमण होणार, हे निश्चित आहे. त्यामुळे ही मोहीम फक्त वरवरची मलमपट्टी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गरिबांवर बुलडोझर, श्रीमंत मात्र सुटले!

पहिल्याच दिवशी सुमारे २०० अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्यात आला. मात्र, या मोहिमेत फक्त गरिबांवर कारवाई झाली, श्रीमंत मात्र सुटले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांनी आणि प्रभावशाली व्यक्तींनी अतिक्रमण करून व्यापारी संकुले उभी केली आहेत, पण प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही.

नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

या अतिक्रमणविरोधी मोहिमेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गरिबांचे दुकान, गाड्या, शेड काढले जात असताना मोठ्या व्यावसायिकांचे अनधिकृत बांधकाम मात्र जस्साच्या तस्से उभे आहे. प्रशासनाने सर्वसामान्य लोकांवर अन्याय न करता सर्वांवर समान न्यायाच्या तत्वानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

या मोहिमेचा पुढील टप्पा कसा असेल आणि मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटवले तरी ते पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा ही मोहीम केवळ दिखाऊ ठरेल, अशी नागरिकांची भावना आहे.

Previous Post

तुळजापूरचा जमीन गैरव्यवहार : भ्रष्ट्राचाराचा सुळसुळाट आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची फरफट !

Next Post

नळदुर्गच्या श्री खंडोबा यात्रेनंतर प्रशासनाची ढिलाई ! कचरा समस्यामुळे आरोग्य धोक्यात !

Next Post
नळदुर्गच्या श्री खंडोबा यात्रेनंतर प्रशासनाची ढिलाई ! कचरा समस्यामुळे आरोग्य धोक्यात !

नळदुर्गच्या श्री खंडोबा यात्रेनंतर प्रशासनाची ढिलाई ! कचरा समस्यामुळे आरोग्य धोक्यात !

ताज्या बातम्या

तेरणाची राखरांगोळी, लाटलेल्या जमिनी अन् आता ‘हावरगाव’मध्ये शेतकऱ्यांची बुडवलेली बिले!

तेरणाची राखरांगोळी, लाटलेल्या जमिनी अन् आता ‘हावरगाव’मध्ये शेतकऱ्यांची बुडवलेली बिले!

September 29, 2026
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका

September 29, 2026
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनता दरबार’ सुरू, नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार

‘कागदावर नाकाबंदी, शिवारात कोरडबंदी!’ — साहेब, चारा शिल्लकच नाही, मग निर्यात हवेत करणार का?

September 29, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धुळे महामार्गावरील गरोदर नर्तिका हत्याकांडातील फरार जोडपे कळंब पोलिसांच्या जाळ्यात; पांढऱ्या मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या

September 28, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

September 27, 2026

Recent Posts

  • तेरणाची राखरांगोळी, लाटलेल्या जमिनी अन् आता ‘हावरगाव’मध्ये शेतकऱ्यांची बुडवलेली बिले!
  • भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका
  • ‘कागदावर नाकाबंदी, शिवारात कोरडबंदी!’ — साहेब, चारा शिल्लकच नाही, मग निर्यात हवेत करणार का?
  • धुळे महामार्गावरील गरोदर नर्तिका हत्याकांडातील फरार जोडपे कळंब पोलिसांच्या जाळ्यात; पांढऱ्या मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या
  • धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!