• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

प्रशासकीय निद्रा आणि बळीराजाची कडू दिवाळी!

सोशल मीडियावरील पगारी पोपट आणि आमचे आव्हान!

admin by admin
October 16, 2025
in सडेतोड
Reading Time: 1 min read
काळी आईच वाहून गेली, आता पेरायचं काय?
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

अवघ्या दोन दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. घराघरात दिव्यांची आरास, फराळाचा सुगंध आणि उत्साहाचे वातावरण असावे, अशी अपेक्षा असताना धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाच्या घरात मात्र भयाण अंधार आणि चिंतेचे सावट पसरले आहे. एका बाजूला निसर्गाने मारले आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाने झोडपले, अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्याची दिवाळी गोड कशी होणार? जिल्हा प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे आणि सरकारच्या पोकळ घोषणांमुळे आज जिल्ह्यातील लाखो अन्नदात्यांच्या तोंडचा घास पळवला गेला आहे. शासनाच्या नव्या मदत यादीतून धाराशिव जिल्ह्याचे नाव वगळले जाणे, हे केवळ प्रशासनाचे अपयश नाही, तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा निर्दयी प्रकार आहे.

संकट कधीही एकटे येत नाही, याचा प्रत्यय धाराशिवचा शेतकरी सध्या घेत आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी शासनाने १८९ कोटी रुपये मंजूर केले, पण दिवाळी तोंडावर आली तरी जिल्ह्यातील ५० टक्के शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. केवायसी आणि बंद पडलेले पोर्टल ही तांत्रिक कारणे सांगून प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. ही मदत शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवणे हे प्रशासनाचे कर्तव्य होते, ज्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत.

हे कमी होते की काय, म्हणून सप्टेंबर महिन्यात झालेल्या महाभयंकर नुकसानीचा प्रस्तावच जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवला नाही. हा केवळ हलगर्जीपणा नाही, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रति असलेली असंवेदनशीलता आणि बेफिकिरी आहे. १५ ऑक्टोबर रोजी शासनाने इतर जिल्ह्यांसाठी ४८० कोटींची मदत जाहीर केली, तेव्हा आमच्या जिल्ह्याचे नाव गायब होते. जिल्हाधिकारी कार्यालय झोपा काढत होते काय? की त्यांना शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि उद्ध्वस्त झालेली पिके दिसली नाहीत? एकाच हंगामात एकदाच मदत मिळते, हा नियम माहीत असूनही सप्टेंबरचा प्रस्ताव वेळेवर न पाठवून प्रशासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्याचा अक्षम्य गुन्हा केला आहे.

सोशल मीडियावरील पगारी पोपट आणि आमचे आव्हान!

‘धाराशिव लाइव्ह’ने जेव्हा हे सत्य चव्हाट्यावर आणले, तेव्हा काही राजकीय पक्षांचे पगारी नोकर सोशल मीडियावर ही बातमी खोटी असल्याचे सांगत सुटले आहेत. ज्यांना शेतीतला ‘ओ’ की ‘ठो’ कळत नाही, असे चाळीस पैशांचे कमेंटबहाद्दर शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. आमचे त्यांना खुले आव्हान आहे: त्यांनी शासनाचा १५ ऑक्टोबरचा जीआर डोळे उघडून वाचावा आणि सांगावे की त्यात धाराशिव जिल्ह्याचे नाव का नाही? त्यांनी सांगावे की सप्टेंबरमध्ये उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला मदत कधी मिळणार?

मंत्रिमंडळ बैठक, मग अर्थखात्याची मंजुरी आणि त्यानंतर जीआर, या प्रक्रियेला किमान एक महिना लागतो, हे वास्तव आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी मदत मिळेल, हा प्रशासनाने आणि सरकारने फुगवलेला बुडबुडा आता फुटला आहे. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणे आता बस झाले.

आज बळीराजा हताश आहे. दिवाळीच्या सणात त्याच्या घरात चूल पेटणार की नाही, याची चिंता त्याला लागली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे त्याची दिवाळी अंधारात गेली आहे, यात तिळमात्र शंका नाही. शासनाने केवळ घोषणांचा पाऊस पाडण्याऐवजी प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार, याचे उत्तर द्यावे. अन्यथा, शेतकऱ्यांच्या मनातला संतापाचा लाव्हा ज्या दिवशी उसळून वर येईल, त्या दिवशी खुर्च्यांवर बसलेल्या या बेफिकीर व्यवस्थेला त्याची धग नक्कीच जाणवेल. या काळ्या दिवाळीला जबाबदार कोण? याचे उत्तर जिल्हा प्रशासनाला आणि सरकारला द्यावेच लागेल!

  •  सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह 
Previous Post

बुलेटराजांना दणका! कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ५० सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर

Next Post

धाराशिव जिल्ह्यात अवैध कला केंद्रांवर पुन्हा एकदा प्रशासनाचा बडगा; साई कला केंद्राला टाळे, मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Next Post
धाराशिव जिल्ह्यात अवैध कला केंद्रांवर पुन्हा एकदा प्रशासनाचा बडगा; साई कला केंद्राला टाळे, मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

धाराशिव जिल्ह्यात अवैध कला केंद्रांवर पुन्हा एकदा प्रशासनाचा बडगा; साई कला केंद्राला टाळे, मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

September 6, 2026
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

September 6, 2026
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
  • तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद
  • अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!