• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; मोटारसायकल, वीजतारा आणि डिझेल लंपास

admin by admin
July 23, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात मोटारसायकल, उच्चदाब वीजवाहिनीची ॲल्युमिनियम तार आणि ट्रकमधील डिझेल चोरीच्या चार वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

धाराशिव शहरातील बेंबळी रोडवरील शिवपार्वतीनगर येथून रमाकांत गोपाळराव कुर्ले (वय 63) यांची सुमारे 80 हजार रुपये किमतीची होंडा शाईन (एमएच-25-बीसी-6794) मोटारसायकल 20 ते 21 जुलैदरम्यान अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिरेन्टीका कंपनीच्या 33 केव्ही उपवाहिनीवरील ॲल्युमिनियम तार चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. बरमगाव शिवारात 29 जून रोजी सहा पोलवरील सुमारे एक किलोमीटर लांबीची वीजतार, अंदाजे 70 हजार रुपयांचा मुद्देमाल, अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद सुपरवायझर खंडेराव दगडू भतलवंडे यांनी दिली आहे.

तसेच, आंबेवाडी शिवारात 5 जुलै रोजी याच प्रकारे सहा पोलवरील सुमारे एक किलोमीटर ॲल्युमिनियम तार, अंदाजे 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. या प्रकरणी सोरिजन आर. ई. सर्व्हिसेस प्रा. लि.चे असिस्टंट जनरल मॅनेजर संतोष कृष्णराव पेरुले यांनी फिर्याद दिली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये भा.न्या.सं. कलम 303(2) व 324(4) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याशिवाय, तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजी आमाईन्ससमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून 210 लिटर डिझेल, अंदाजे 20 हजार 580 रुपये किमतीचे, अज्ञात चोरट्यांनी स्विफ्ट कारच्या सहाय्याने चोरी केल्याची घटना घडली. ट्रक चालक प्रथमेश दत्तात्रय कोळेकर (रा. नारायण चिंचोळी, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

तुळजापुरात तरुणाला लोखंडी रॉड व बेल्टने बेदम मारहाण! जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी

Next Post

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

Next Post
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
  • उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली
  • धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
  • आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!