धाराशिव : कमी दरामध्ये चांगली गाडी देतो म्हणून सव्वा दोन लाखाला गंडवणाऱ्या पुण्याच्या बंटी – बबली विरुद्ध धाराशिवमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-1) योगेश सरक, 2) प्रियंका विनोद माने दोघे रा. मांजरी हडपसर पुणे यांनी दि.14.02.2024 रोजी 11.00 ते दि. 18.02.2024 रोजी 13.34 वा. दरम्यान समर्थनगर धाराशिव येथे फिर्यादी नामे- राजेश विजयकुमार जोशी, वय 36 वर्षे, रा. समर्थ नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांना कमी दरामध्ये चांगली गाडी आलेली आहे ती तु घे असे म्हणून नमुद आरोपींने फिर्यादी कडून 2,15,000 ₹ फोन पे वर पैसे घेवून गाडी व पैसे न देता संगणमत करुन आर्थिक फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राजेश जोशी यांनी दि.23.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 420, 406, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मोटारसायकलची चोरी
धाराशिव : फिर्यादी नामे-सतेज विष्णु कांबळे, वय 32 वर्षे, रा. कुमाळवाडी ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 65,000₹ किंमतीची मोटारसायकल ( एमएच 25 एझेड 9606 चेसी नंME4HC152 KPG161363 व इंजिन नं HC15EG 11611038 ) ही दि.20.04.2024 रोजी 19.00 ते 22.30 शिंगोली येथील बसस्थानकाचे बाजूच्या हॉटेल समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सतेज कांबळे यांनी दि.23.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.