नळदुर्ग : आरोपी नामे-1)गोविंद दतृता चव्हाण, रा. कल्याण दत्त मंदीर जवळ सोलापूर यांनी दि.22.04.2024 रोजी 12.00 वा. सु. ईटकळ येथे फिर्यादी नामे- निर्मला रावसाहेब पवार, वय 40 वर्षे, रा. हन्नुर ता. अक्कलकोट जि. सोलापूर यांना नमुद आरोपीने मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निर्मला पवार यांनी दि.23.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 324, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : आरोपी नामे-जनार्धन गणपती गायकवाड, वय 65 वर्षे, रा. वत्सलानगर झोपडपट्टी अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.16.04.2024 रोजी 20.00 वा. सु. अणदुर येथील शेत गट नं 25/3 येथे फिर्यादी नामे- आण्णासाहेब अरविंद आलुरे, वय 32 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पाणी भरण्यास सांगितल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आण्णासाहेब आलुरे यांनी दि.23.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 324, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मोटारसायकल अपघातात एक ठार, एक जखमी
उमरगा : आरोपी मयत नामे- नागनाथ संगाप्पा क्षिरसागर, वय 51 वर्षे, रा. बारुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.09.04.2024 रोजी 19.30 वा. सु. बिरुदेव मंदीराचे समोर उमरगा चौरस्ता ते लातुर जाणारे रोडवर उभा असताना मोटरसायकल क्र एमएच 14 एके 1853 चालक आरोपी नामे- बसवराज रामलिंग कुनाळे, रा. सलगरा ता. आळंद यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून नागनाथ क्षिरसागर यांना धडक दिली. या अपघातात नागनाथ क्षिरसागर हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. तर स्वत: आरोपी नामे- बस्वराज कुनाळे व त्याचे पाठीमागे बसलेले श्रीशैल्य तनाजी खवडे यांना जखमी करणे कारणीभुत झाला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रघुनाथ संगप्पा क्षिरसागर, वय 45 वर्षे, रा. बारुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.23.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.