• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जाब विचारल्याच्या रागातून मद्यपींची कुटुंबाला बेदम मारहाण; ‘धाराशिवला आल्यावर कापून टाकू’ अशी धमकी

admin by admin
May 2, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: दारू पिऊन बसलेल्या तरुणांनी एका कुटुंबाला पाहून मोठ्याने शेरेबाजी केली. ‘तुम्ही असे का बोलता?’ असा जाब विचारल्याच्या रागातून १२ जणांच्या जमावाने कुटुंबाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना गडदेवदरी (ता. धाराशिव) येथे घडली. तसेच, ‘धाराशिवला आल्यावर कापून टाकू’ अशी जिवे मारण्याची धमकीही या मद्यपींनी दिली आहे. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांची नावे आणि अन्य नऊ जण अशा एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडदेवदरी (ता. जि. धाराशिव) येथील बाबू मरेगा आढाव (वय ३८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. ३० एप्रिल) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गडदेवदरी जवळील रेल्वे ब्रिजजवळ आणि गावातील चौकात हा प्रकार घडला.

फिर्यादी बाबू आढाव यांचा भाऊ दत्ता, विकास, त्यांची पत्नी आणि मुलगा हे येथून जात होते. त्यावेळी आरोपी सोमनाथ बंडू धोत्रे, लक्ष्मण दिलीप घोडके, काशिनाथ चन्नप्पा दंडगुले (सर्व रा. वडार गल्ली, धाराशिव) व त्यांचे इतर ९ साथीदार तेथे दारू पीत बसले होते. कुटुंबाला पाहून या मद्यपींनी काहीतरी मोठ्याने बोलण्यास सुरुवात केली.

यावेळी फिर्यादीच्या भावाने ‘तुम्ही असे का बोलता?’ असे विचारत त्यांना जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून कुटुंबाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने कुटुंबाला बेदम मारहाण करून जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, ‘तुम्ही धाराशिवला आल्यावर तुम्हाला कापून टाकतो,’ अशी गंभीर धमकीही या तरुणांनी दिली.

या मारहाणीत जखमी झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून बाबू आढाव यांनी शुक्रवारी (दि. १ मे) पोलिसांत तक्रार दिली. या प्रथम खबरीवरून (FIR) धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील सर्व १२ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), १२५(अ), १२५(ब), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.

Previous Post

शेत नांगरण्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; १५ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Next Post

जिल्ह्यात भुरट्या चोऱ्यांचा सुळसुळाट; गर्दीचा फायदा घेत दोन महिलांचे दागिने लांबवले, तर एकाची दुचाकी पळविली

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात भुरट्या चोऱ्यांचा सुळसुळाट; गर्दीचा फायदा घेत दोन महिलांचे दागिने लांबवले, तर एकाची दुचाकी पळविली

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026

Recent Posts

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!