• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरात अनागोंदी: कचरा आणि नाली समस्येने नागरिक त्रस्त

 प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचे थैमान

admin by admin
May 12, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात अनागोंदी: कचरा आणि नाली समस्येने नागरिक त्रस्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या धाराशिव शहरात सध्या कचरा आणि नाली सफाईच्या समस्येने उग्र रूप धारण केले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दीड लाख लोकसंख्या आणि नव्वद हजार मतदार असलेल्या या शहरात गेल्या तीन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकाचे राज्य आहे. येत्या चार महिन्यांत निवडणुका तोंडावर असताना दुसरीकडे पालिका प्रशासनातील भ्रष्टाचार उघडकीस येत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरातील कचरा आणि नाली सफाईचे काम बारामतीच्या एका कंत्राटदाराला वार्षिक तब्बल आठ कोटी रुपयांना देण्यात आले आहे. मात्र, पालिका कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळे शहराचे आरोग्य रामभरोसे झाले आहे. नियमानुसार प्रत्येक प्रभागात किमान १० ते १२ कामगार, म्हणजेच एकूण १९ प्रभागांसाठी सुमारे २०० कामगार नेमणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात केवळ ३० ते ४० कर्मचारीच कार्यरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अनेक प्रभागांमध्ये तर एकही कामगार फिरकत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, नागरिकांनी तक्रार केल्यास तात्पुरती मलमपट्टी म्हणून कामगार पाठवले जातात. मात्र, नाली साफ करणे किंवा कचरा उचलल्यानंतर हेच कामगार नागरिकांकडून पैशांची मागणी करत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. यावरून प्रशासकीय यंत्रणा किती पोखरली गेली आहे, याचा अंदाज येतो.

या भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे, बोगस हजेरीपट दाखवून कंत्राटदारामार्फत कोट्यवधी रुपयांची देयके उचलली जात असल्याचा आरोप होत आहे. कामगारांना वेळेवर पगार मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलणे आणि नाली साफ करणे पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ ही घोषणा केवळ कागदावरच उरली असून, शहरवासीयांना दुर्गंधी आणि रोगराईचा सामना करावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Previous Post

धाराशिवकरांनो, आता डोळे २०२५ कडे!  कृष्णा खोऱ्याचं पाणी ‘येणार, येणार’ म्हणता म्हणता बजेट वाढलं, पण पाणी काही येईना!

Next Post

केशेगावात प्लॉट विक्रीच्या वादातून महिलेला मारहाण; नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

केशेगावात प्लॉट विक्रीच्या वादातून महिलेला मारहाण; नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट

प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट

September 12, 2026
‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

September 11, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!

September 11, 2026
बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026

Recent Posts

  • प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट
  • ‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा
  • ‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!
  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!