धाराशिवच्या शासकीय विश्रामगृहाचे नाव आता बदलायला हवे! “आओ-जाओ घर तुम्हारा” अशी पाटी लावावी, असे चित्र आहे. पोलीस मुख्यालयासमोरील हे विश्रामगृह, बुकिंग न करताच रूम मिळवणाऱ्या ‘महानुभावां’च्या मखमली सेवेला सज्ज आहे. याच विश्रामगृहात एका अधिकाऱ्याने एक वर्षांपासून कायमची ‘यादवी‘ माजवली आहे. बुकिंग? भाडं? हे शब्द त्याच्या डिक्शनरीतच नाहीत!
विश्रामगृहाची शान वाढवणाऱ्या या अधिकाऱ्याने धाराशिवला सरकारी बंगला घेण्याचा त्रासही घेतलेला नाही. सरकारी दिवसांत इथेच हजर, तर सुट्टीच्या दिवशी पुण्याच्या शिरिशासनात निवांतपणा! असा मल्टीप्लेक्स सारखा फुल्ल टू ताबा आहे. रात्रीचा श्रमपरिहारही ठरलेलाच. काही बेवडे पत्रकार यांच्यासोबत असल्यामुळे, ते ‘खबरदार’ गटात सामील आहेत म्हणे!
हा अधिकारी इतका लाचखोर आहे की, दोनवेळा एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. त्यामुळे बेवडे पत्रकार आणि त्याची चांगलीच गट्टी जमली आहे.
दुसरीकडे, वृत्तपत्रकारितेचे दैवत, बाळशास्त्री जांभेकर, त्यांच्या स्मृती जागवत आहेत की, “अरे बाबा, ही पत्रकारिता की बेवड-रिता?” अशा विचारात असलेले जांभेकर वरून पाहून रडत असल्याचा भास होत आहे.
आता या अधिकाऱ्याचा अन् बेवड्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागेल असं लोक म्हणायला लागले आहेत. तेव्हा हे सरकारी विश्रामगृह नव्हे, तर ‘विश्रामश्री’ पुरस्काराचं पात्र ठरेल की काय अशी शक्यता आहे!
– बोरूबहाद्दर