धाराशिव जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या गडगडासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथे एका तरुण शेतकऱ्यावर वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथे एका दुर्दैवी घटनेत 21 वर्षीय तरुण शेतकरी अजय आशाराम गायकवाड यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. मयत अजय गायकवाड (अविवाहित) हे त्यांच्या शेतातील काढलेल्या सोयाबीनवर तळवट झाकत असताना ही घटना घडली. पावसाचे ढग गोळा होत असतानाच वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वारा
- कळंब तालुक्यात शेतकऱ्यावर वीज पडून मृत्यू
- मयत अजय गाईकवाड हे शेतात काम करत असताना झाले बळी