धाराशिव – शहरातील परशुराम कॉलनी, सांजा रोड येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 93,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेघा नंदकुमार कुलकर्णी (वय 60, रा. राम मंदिराजवळ, धाराशिव) यांच्या राहत्या घराचा कडी-कोंडा तोडून 26 फेब्रुवारी रोजी रात्री 11 ते 27 फेब्रुवारी पहाटे 2 या वेळेत चोरट्याने घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील लोखंडी कपाट फोडून 9 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख 1,000 रुपये असा एकूण 93,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी फिर्यादीने 12 मार्च रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 331(4) आणि 305(ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
उमरग्यात घरासमोरून दुचाकी चोरी; गुन्हा दाखल
उमरगा, – शहरातील अजय नगर परिसरात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवानंद शंकर वाले (वय 48, रा. अजय नगर, उमरगा) यांनी त्यांची अंदाजे 15,000 रुपये किमतीची हिरो एचएफ डिलक्स (काळ्या रंगाची, क्रमांक MH 14 DU 907) ही दुचाकी 10 मार्च रोजी रात्री 7 वाजता घरासमोर उभी केली होती. मात्र, 11 मार्च रोजी सकाळी 6 वाजता ते बाहेर आले असता दुचाकी गायब असल्याचे लक्षात आले.
याबाबत त्यांनी 12 मार्च रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
उमरगा : यात्रेतून दुचाकी चोरी; गुन्हा दाखल
उमरगा – कसगी येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ सुरू असलेल्या यात्रेतून अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश रामराव येवते (वय 50, रा. कदेर, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी त्यांची अंदाजे 14,000 रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर (क्रमांक MH 25 S 3792) ही मोटारसायकल 9 मार्च रोजी दुपारी 2 ते 3 दरम्यान सिद्धेश्वर मंदिराजवळ लावली होती. मात्र, अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेली.
याबाबत प्रकाश येवते यांनी 12 मार्च रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
कळंब : शेतातून केबल चोरी; गुन्हा दाखल
कळंब – तालुक्यातील कन्हेरवाडी शिवार येथील शेतातून अज्ञात चोरट्याने केबल चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय दगडू ओमन (वय 69, रा. कन्हेरवाडी शिवार, ता. जि. धाराशिव) यांच्या शेत गट क्रमांक 245 मधील फिनोलेक्स कंपनीची 204 मीटर लांबीची केबल (अंदाजे किंमत 9,000 रुपये) 7 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 8 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.
याबाबत संजय ओमन यांनी 12 मार्च रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.