• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, November 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरमध्ये गोवंशीय जनावरांची अवैध चमडी वाहतूक

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

admin by admin
March 13, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर  – गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून त्यांची चमडी वाहतूक करताना तुळजापूर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. ही कारवाई तुळजापूर-सोलापूर रोडवरील सिंदफळ बायपासजवळील काका ढाब्यासमोर 11 मार्च रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद अखिल पडसलगीर (33, रा. नई जिंदगी, सोलापूर), अजहर गुलामबाई शेख (23, रा. विजापूर बेस, सोलापूर), माजीद सत्तार शेख (35, रा. बेगमपेठ, सोलापूर), ब्रुद्रुक अब्दुल जब्बार गुंजेगाव (62, रा. बेगमपेठ, सोलापूर) आणि गफार करीम शेख (51, रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) हे आयशर टेम्पो (क्रमांक MH 13 AX 9387) मधून 4.5 टन गोवंशीय जनावरांची चमडी अवैधरीत्या वाहतूक करताना आढळले.

याबाबत पशुवैद्यकीय विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आरोपींनी गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करून चमडी विक्रीसाठी नेत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या मालाची अंदाजे किंमत 4,99,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित अधिनियमातील कलम 5 (क) व 9 तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

वाशीमध्ये निर्दयपणे जनावरांची वाहतूक; एकावर गुन्हा दाखल

वाशी  – निर्दयपणे आणि बेकायदेशीररित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करताना वाशी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एनएच-52 महामार्गावर पार्डी फाटा येथे 12 मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राम जिजाराम साळवे (34, रा. आंबेडकर नगर, राशिन, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हा बोलेरो पिकअप (क्रमांक MH 45 T 3340) मधून 39 जीवंत वासरे, 4 मृत वासरे, एक रेडकू आणि एक मृत रेडकू अशा एकूण 43 जनावरांची निर्दयतेने वाहतूक करताना आढळला.

वाहनात जनावरांना हालचालीसाठी पुरेशी जागा नव्हती तसेच त्यांना अन्न-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वाहनासह एकूण 3,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत कलम 11(1), 11(1)(ए), 11(1)(एफ), 11(1)(एच), 11(1)(आय) तसेच प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत कलम 5(अ), 5(ब), 9, 11 आणि प्राण्यांच्या परिवहन नियमावलीतील कलम 47, 54, 56 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.

Previous Post

तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढणार?

Next Post

धाराशिवमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : महामार्गावर स्कॉर्पिओ आडवी लावून पवनचक्कीचे साहित्य नेणाऱ्या ट्रकला अडवले

November 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : मोटरसायकलला कट मारल्याच्या वादातून नारंगवाडीत राडा

November 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : “बहिणीशी बोलू नको असे सांगणारा तू कोण?” म्हणत तरुणासह भावजीवर काचेची बाटली व बेल्टने प्राणघातक हल्ला

November 17, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव : आळणी फाटा येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग अडवला

November 17, 2026
धाराशिव: मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जणांवर गुन्हा दाखल, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

ढोकीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल, १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

November 14, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : महामार्गावर स्कॉर्पिओ आडवी लावून पवनचक्कीचे साहित्य नेणाऱ्या ट्रकला अडवले
  • उमरगा : मोटरसायकलला कट मारल्याच्या वादातून नारंगवाडीत राडा
  • उमरगा : “बहिणीशी बोलू नको असे सांगणारा तू कोण?” म्हणत तरुणासह भावजीवर काचेची बाटली व बेल्टने प्राणघातक हल्ला
  • धाराशिव : आळणी फाटा येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग अडवला
  • ढोकीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल, १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!