• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, November 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा : “बहिणीशी बोलू नको असे सांगणारा तू कोण?” म्हणत तरुणासह भावजीवर काचेची बाटली व बेल्टने प्राणघातक हल्ला

चौघांवर गुन्हा दाखल

admin by admin
November 17, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा  : “बहिणीशी बोलू नको म्हणून सांगणारा तू कोण?” असा जाब विचारत एका १८ वर्षीय तरुणासह त्याच्या भावजीवर काचेची बाटली आणि हंटर बेल्टने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना उमरगा तालुक्यातील डिग्गी येथे घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात एका मुख्य आरोपीसह इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिग्गी (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथील रहिवासी आंबादास संगमेश्वर वाघमारे (वय १८ वर्षे) आणि त्यांचे भावजी हे १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास गावात असताना हा प्रकार घडला. गावातीलच संशयित आरोपी शानू विजयकुमार माळगे आणि त्याचे इतर तीन साथीदार यांनी त्यांना गाठून “बहिणीस बोलू नको म्हणून सांगणारा तू कोण?” या कारणावरून वाद उकरून काढला.

यानंतर चौघांनी संगनमत करून आंबादास वाघमारे व त्यांच्या भावजीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी दोघांना लाथाबुक्क्यांसह काचेची बाटली आणि हंटर बेल्टने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

उपचारानंतर आंबादास वाघमारे यांनी १६ नोव्हेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी मुख्य आरोपी शानू विजयकुमार माळगे आणि त्याच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१) (धोकादायक साधनाने गंभीर दुखापत करणे), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(२)(३) (जीवे मारण्याची धमकी) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव : आळणी फाटा येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग अडवला

Next Post

उमरगा : मोटरसायकलला कट मारल्याच्या वादातून नारंगवाडीत राडा

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : मोटरसायकलला कट मारल्याच्या वादातून नारंगवाडीत राडा

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : महामार्गावर स्कॉर्पिओ आडवी लावून पवनचक्कीचे साहित्य नेणाऱ्या ट्रकला अडवले

November 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : मोटरसायकलला कट मारल्याच्या वादातून नारंगवाडीत राडा

November 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : “बहिणीशी बोलू नको असे सांगणारा तू कोण?” म्हणत तरुणासह भावजीवर काचेची बाटली व बेल्टने प्राणघातक हल्ला

November 17, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव : आळणी फाटा येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग अडवला

November 17, 2026
धाराशिव: मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जणांवर गुन्हा दाखल, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

ढोकीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल, १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

November 14, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : महामार्गावर स्कॉर्पिओ आडवी लावून पवनचक्कीचे साहित्य नेणाऱ्या ट्रकला अडवले
  • उमरगा : मोटरसायकलला कट मारल्याच्या वादातून नारंगवाडीत राडा
  • उमरगा : “बहिणीशी बोलू नको असे सांगणारा तू कोण?” म्हणत तरुणासह भावजीवर काचेची बाटली व बेल्टने प्राणघातक हल्ला
  • धाराशिव : आळणी फाटा येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग अडवला
  • ढोकीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल, १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!